Dasryachya shubhechha : आश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नऊ दिवस नवरात्र असते. त्यांनंतरचा दहावा दिवस म्हणजेच 'दसरा', ह्याच सणाला विजयादशमी असेही म्हणतात. या वर्षी १२ ऑक्टोबर रोजी दसरा सण साजरा केला जात आहे.
दसरा या सणाची परंपरा फार पूर्वीपासूनची आहे. याच दिवशी देवीने महिषासुर या राक्षसाचा वध केला. प्रभू रामानेही याच दिवशी रावणाचा वध केला. पांडव अज्ञातवासात राहण्याकरिता ज्या वेळी गेले, त्या वेळी त्यांनी आपली शास्त्रे शमीच्या झाडावर ठेवली होती. अज्ञातवास संपल्यावर त्यांनी तेथील शस्त्रे परत घेतली व त्या झाडाची पूजा केली, तो हाच दिवस. दसरा म्हणजेच विजयादशमी . हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. विजयादशमी म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय मिळवून देणारा दिवस. दसरा या सणाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी आपल्या प्रियजणांना पाठवा हे खास शुभेच्छा संदेश.
सांगता नवरात्राची,
जल्लोष विजयाचा..
साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त
सण हा दसऱ्याचा.
दसऱ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा
…
सुख, समृद्धी, शांती आणि
यशाच्या शुभेच्छांसह,
दसऱ्याच्या पवित्र
सणाच्या हार्दिक शुभेच्छा.
…
आपट्याच्या पानांची
होते देवाणघेवाण..
प्रेमाचा ओलावा
करुनी दान..
शुभ दसरा..!
…
दसऱ्याचा हा पवित्र सण
तुमच्या घरात अपार आनंद आणो
भगवान श्रीराम तुमच्यावर
व तुमच्या परिवारावर
सुखाचा वर्षाव करोत
दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा
…
वाईटावर चांगल्याचा आणि
अधर्मावर धर्माचा विजयाचा
महान सण विजयादशमीच्या
निमित्ताने तुम्हा सर्वांना
हार्दिक शुभेच्छा..
…
दु:खाच्या काळोखाला हरवून टाका कायमचे,
आनंद आणि यश तुमच्या जीवनात फुलू दे रोजचे!
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा
…
तुम्ही यशस्वी व्हा, असो तुमचं भाग्य खास,
तुमच्या वाटेवर फुलू देत नव्या स्वप्नांचा प्रवास.
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
…
साडेतीन मुहूर्तांपैकी एक,
दसरा हा सण विजयाचा..
देवीने केला वध असूराचा,
दिन पराक्रमाचा, पौरुषाचा
दसरा व विजयादशमीच्या
हार्दिक शुभेच्छा!
…
संकटांना मागे टाकून,
यशाच्या नव्या शिखराकडे तुमचं लक्ष असो.
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
…
अधर्मावर धर्माचा विजय
असत्यावर सत्याचा विजय
वाईटावर चांगल्याचा विजय
पापावर पुण्याचा विजय
अत्याचारावर सद्गुणाचा विजय
क्रोधावर दया आणि क्षमा यांचा विजय
आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय
असा आहे “विजयादशमीचा” सण !
तुम्हाला व तुमच्या परिवाराला
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !
…
सोनं वाटण्याइतका मी श्रीमंत नाही,
पण नशिबानं जी सोन्यासारखी
माणसं मला मिळाली..
सोन्यासारखे तुम्ही आहातच..
सदैव असेच राहा..
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !