हिंदू धर्मात दसऱ्याला विशेष महत्त्व आहे. वाईटावर चांगल्याच्या विजयाचा सण दरवर्षी दसरा साजरा केला जातो. हा सण शारदीय नवरात्रीच्या १० व्या दिवशी म्हणजेच दशमीला साजरा केला जातो. दसऱ्याला विजयादशमी असेही म्हटले जाते. दसऱ्याला एकमेकांना सोनं म्हणून आपट्याची पाने दिली जातात. तसेच दसऱ्याला रावणाचे दहनही केले जाते.
दसऱ्याच्या दिवशी माता दुर्गादेवीने महिषासुर या राक्षसाचा वध केला होता आणि भगवान श्रीरामाने रावणाचा वध केला होता. असे मानले जाते की, या दिवशी भगवान श्रीरामाची योग्य प्रकारे पूजा केल्यास पुण्य प्राप्त होते. चला जाणून घेऊया दसरा केव्हा आहे, या दिवसाचा विजय मुहूर्त आणि श्री रामाची पूजा पद्धत-
पंचांगानुसार, विजयादशमी उत्सवाची पूजा शनिवार, १२ ऑक्टोबर रोजी श्रवण नक्षत्रामुळे दुपारी होणार आहे. या दिवशी सीमा ओलांडणे आणि शमी वृक्षाची पूजा करण्याबरोबरच प्रवास केल्यास पूर्ण यश मिळेल अशी मान्यता आहे. नवरात्रीची महानवमी ही १२ ऑक्टोबरला असेल तर दसराही १२ ऑक्टोबरला साजरा होईल. या वेळी दसऱ्याची पूजा नवरात्रीच्या उपवासात होणार आहे.
दशमी तिथी प्रारंभ - १२ ऑक्टोबर २०२४ रात्री १० वाजून ५८ मिनिटे.
दशमी तिथी समाप्ती - १३ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री ९ वाजून ८ मिनिटे.
श्रवण नक्षत्र प्रारंभ - १२ ऑक्टोबर २०२४ रोजी ५ वाजून २५ मिनिटे.
श्रवण नक्षत्र समाप्ती - १३ ऑक्टोबर २०२४ दुपारी ४ वाजून २७ मिनिटे.
अपराह्य वेळ - दुपारी १ वाजून १७ मिनिटे ते ३ वाजून ३५ मिनिटे.
कालावधी - २ तास १९ मिनिटे
विजय मुहूर्त - २ वाजून ३ मिनिटे ते २ वाजून ४९ मिनिटे.
कालावधी - ०० तास ४६ मिनिटे
हिंदू पंचांगानुसार दसऱ्याला फार चांगला शुभ मुहूर्त तयार झालाय. दसऱ्याला सर्वार्थ सिद्धी योग आणि श्रवण योग तयार होत आहे. सर्वार्थ सिद्धी योग १२ ऑक्टोबर पहाटे ५ वाजून २५ मिनिटे ते १३ ऑक्टोबर पहाटे ४ वाजून २७ मिनिटापर्यंत राहील. तर श्रवण योगही १२ ऑक्टोबर पहाटे ५ वाजून २५ मिनिटे ते १३ ऑक्टोबर पहाटे ४ वाजून २७ मिनिटापर्यंत राहील.
स्नान वगैरे करून देवघराची स्वच्छता करावी. देवपूजा करावी. भगवान श्रीरामाचा जलाभिषेक करावा. पंचामृतासह गंगाजलाने श्रीरामाला अभिषेक करावा. यानंतर पिवळे चंदन आणि पिवळी फुले भगवंताला अर्पण करा. मंदिरात तुपाचा दिवा लावावा. भगवान श्री हरी विष्णू आणि श्री रामाची पूर्ण भक्तिभावाने आरती करा. देवाला तुळशीची पाने आणि तुळशीच्या मंजुळा अर्पण करा. शेवटी क्षमाप्रार्थना करा.