Dasara Shastra Puja Importance: दसरा हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. या दिवशी प्रभू रामाने लंकापती रावणाचा वध केला होता. रावणाच्या वाढत्या अत्याचारामुळे आणि अहंकारामुळे भगवान विष्णूने प्रभू रामाचा अवतार घेतला. यानंतर रावणाचा वध करून पृथ्वीला अत्याचारापासून मुक्त केले. याच दिवशी दुर्गामातेने ९ दिवसाच्या युद्धानंतर महिषासुराचा वध केला होता. यामुळे दसऱ्याला विजयादशमी असेही म्हटले जाते. विजयादशमीला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे.
या दिवशी दुर्गा मातेने महिषासूर या राक्षसासोबत ९ दिवस युद्ध केले आणि दहाव्या दिवशी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी त्याचा वध केला. याच दिवशी भगवान श्रीरामाने लंकेत रावणाचा वध केला आणि सीतेला लंकेच्या बंदिवासातून मुक्त केले. या दोन्ही कथा विजयाचे आणि शौर्याचे प्रतिक दर्शवतात.
दसऱ्याच्या दिवशी माता दुर्गा आणि भगवान राम यांची पूजा केली जाते. दुर्गामातेच्या शक्तीचे प्रतीक आहे. तर, भगवान श्रीराम हे प्रतिष्ठेचे, धर्माचे आणि आदर्श व्यक्तिमत्त्वाचे प्रतीक आहेत. जीवनात सामर्थ्य, प्रतिष्ठा, धर्म आणि आदर्शांना विशेष महत्त्व आहे, ज्या व्यक्तीमध्ये हे गुण असतात त्याला यश मिळते.
दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची पूजा का केली जाते, यामागे अनेक कारणे आहेत. त्यापैकी एक म्हणजे, पूर्वीच्या काळात राजे महाराजे युद्धाला निघण्यापूर्वी शस्त्रांची पूजा करायचे. तेव्हापासून शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा सुरु झाली. आजसुद्धा विविध समजातील लोक दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची पूजा करतात. क्षत्रिय परिवाराच्याद्वारे आपल्या कुल देवी-देवतांचा सन्मान करुन त्यांना प्रसाद दाखवला जातो. त्यांचे अससे म्हणणे आहे की, त्यांच्या घराच्या पूजेच्या ठिकाणी ठेवलेल्या जुन्या शस्त्रांमध्ये देवी- देवतांचा वास आहे.
दसऱ्याच्या दिवशी सूर्यास्तानंतर प्रदोष काळात रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. यंदा रावण दहनाची वेळ २४ ऑक्टोबर सायंकाळी ५.४३ वाजल्यापासून सुरु होणार आहे. विजयादशमीला विजय मुहूर्तावर शस्त्रपूजन केले जाईल. विजय मुहूर्त हा २४ ऑक्टोबर २०२३ दुपारी ०१.५८ ते ०२.४३ पर्यंत आहे. तर, अभिजीत मुहूर्त हा २४ ऑक्टोबर २०२३ सकाळी ११.४३ ते दुपारी १२.२८ पर्यंत आहे.