मराठी बातम्या  /  धर्म  /  Vijayadashmi 2022 : सूर्यास्तानंतर रावण दहन कधी करावं, रावण दहनाचे मुहूर्त कोणते

Vijayadashmi 2022 : सूर्यास्तानंतर रावण दहन कधी करावं, रावण दहनाचे मुहूर्त कोणते

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Oct 04, 2022 03:08 PM IST

Dussehra 2022, Ravan Dahan Muhurta 2022: दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते. 2022 मध्ये रावण दहनाचा सर्वोत्तम काळ कोणता आहे हे तुम्हाला माहिती आहे का.

रावण दहन
रावण दहन (हिंदुस्तान टाइम्स)

हिंदू कॅलेंडरनुसार, दसरा किंवा विजयादशमी हा सण देशभरात अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी साजरा केला जातो. यंदा दसरा बुधवार, ५ ऑक्टोबरला आहे. दसऱ्याच्या सणाला आयुधा पूजा असेही म्हणतात. दसऱ्याच्या सणाबाबत अनेक पौराणिक कथा आहेत. प्रभू रामाने रावणाचा वध आणि माता दुर्गेने महिषासुराचा अंत. दसरा हा सण वाईटावर चांगल्याचे प्रतीक आहे.

काय आहे दसऱ्याचे महत्त्व

दसऱ्यालाच रामाने रावणाच्या तावडीतनं सीतेची सुटका केली तर महिषासूर नामक राक्षस नऊ दिवस चाललेल्या लढाईनंतर दुर्गेने मारला आणि प्रजेची महिषासुराच्या तावडीतनं सुटका केली. त्यामुळेच दसऱ्याच्या किंवा विजयादशमीच्या दिवसाला अनन्य साधारण महत्व प्राप्त झालं आहे. हा दिवस सत्याचा असत्यावर विजय म्हणून कायम ओळखला जातो. सर्वसाधारण माणसाला असत्य कितीही मोठं असलं तरीही सत्य त्यासमोर कधीही हार मानत नाही. आज नाही तर उद्या सत्याचाच विजय होतो हे कलीयुगातलंही शाश्वत असल्याचं प्रमाण देतं. काळ कोणताही असो, शतक कोणतंही असो या विश्वात एकच गोष्ट शाश्वत असेल आणि ती म्हणजे सत्य याचा पुन्हा पुन्हा दाखला देणारा दिवस म्हणूनही दसऱ्याकडे पाहिलं जातं.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक दसऱ्याचा दिवस सर्वोत्तम मानला जातो. पण दसऱ्याची संध्याकाळची वेळ सर्वात शुभ मानली जाते आणि सायंकाल विजय काल म्हणून ओळखला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार विजयाच्या काळात कोणतेही काम केल्यास त्यात विजय प्राप्त होतो. या काळात खरेदी करणे आणि नवीन काम सुरू करणे खूप फायदेशीर मानले जाते. दसऱ्याच्या दिवशी नीलकंठाचे दर्शन घेणे अत्यंत शुभ मानले जाते.

काय आहे रावण दहनाचा शुभ मुहूर्त

दसऱ्याच्या दिवशी रावण दहन केले जाते. या दिवशी रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्याचा शुभ मुहूर्त सूर्यास्तानंतर रात्री ८.३० पासून असेल. रावण दहन नेहमीच प्रदोष काळात श्रावण नक्षत्रात केले जाते. रावणाचे दहन केल्यानंतर त्याची राख घरी आणणे अत्यंत शुभ मानले जाते. असे केल्याने नकारात्मकता दूर होते असे मानले जाते.

रावण दहनाचा विजय मुहूर्त दुपारी २.०७ ते २.५४ पर्यंत आहे. ज्याचा कालावधी ० तास ४७ मिनिटे आहे. पूजेच्या वेळा दुपारी १.२० ते दुपारी ३.४१ पर्यंत आहेत. त्याचा कालावधी २ तास २१ मिनिटे आहे.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग