आज चैत्र नवरात्रीची अष्टमी आहे. नवरात्रीत अष्टमी आणि नवमी हे दोन दिवस अत्यंत शुभ मानले जातात. आजचा दिवस दुर्गामातेच्या महागौरी रुपाची पूजा केली जाते.
या देवी सर्वभूतेषु, शक्तिरूपेण संस्थिता:
नमस्तस्यै.. नमस्तस्यै.. नमस्तस्यै नमो नम:
असं म्हणत दुर्गेच्या महागौरी रुपाचं आपण पूजन करणार आहोत. आजच्या दिवशी काही शुभ योग तयार होत आहेत. त्यासोबतच आज आपण माता महागौरीच्या पुजनाचे शुभ मुहूर्त कोणते आहेत हेही पाहाणार आहोत.
चैत्र नवरात्री २०२३ अष्टमीची तारीख कोणती
नवरात्री अष्टमी तिथीची सुरुवात - २८ मार्च संध्याकाळी ०७.३२ वा
नवरात्रीची समाप्ती तारीख - २९ मार्च रात्री ०९.१० वाजता
दुर्गाष्टमी २०२३ शुभ मुहूर्त कोणते
यावेळी अष्टमी तिथीला दोन प्रकारचे शुभ योग तयार होत आहेत. पहिला शोभन आणि दुसरा रवियोग.
शोभन योगाची सुरुवात: २८ मार्च रात्री ११.३७ वाजता
शोभन योग समाप्त: २९ मार्च दुपारी १२.११ वाजता
महाष्टमीला कन्या पूजन करणं अत्यंत शुभ मानलं गेलं आहे. किमान नऊ मुलींना घरी बोलावलं जातं. त्यांचे पाय धुतले जातात. त्यांना प्रेमाने खाऊ घातलं जातं. त्यांना दक्षिणा म्हणून काही भेटवस्तू दिल्या जातात आणि त्यांना त्यांच्या घरी पाठवलं जातं. कुमारिकांना खाऊ घालणं म्हणजे देवी दुर्गेला खाऊ घालणं असं मानलं गेलं आहे. त्यामुळेच कुमारिका भोजन अष्टमीच्या दिवशी आवर्जुन केलं जातं.
महाष्टमीला कनन्या पूजनाचा शुभ मुहूर्त कोणता
महाष्टमीला कन्या पूजनाचा शुभ मुहूर्त- २९ मार्च रोजी दिवसभर कन्यापूजन फलदायी आहे.
ॐ सर्वमंगल मांगल्ये
शिवे सर्वार्थ साधिके,
शरण्ये त्र्यंबके गौरी
नारायणी नमोस्तुते
ॐ जयन्ती मंगला काली भद्रकाली कपालिनी,
दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तुते.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या