रविवारी १४ एप्रिल रोजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील महू या छोट्याशा गावात झाला. आपल्या खालच्या जातीच्या पार्श्वभूमीमुळे भेदभाव आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत असतानाही, डॉ. आंबेडकरांनी एक प्रमुख विद्वान, न्यायशास्त्रज्ञ आणि समाजसुधारक बनण्यासाठी असंख्य आव्हानांवर मात केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवासाठी सर्वत्र तयारीस वेग आला आहे. जयंतीसाठी लागणाऱ्या विविध वस्तूंनी बाजारपेठ उजळून निघाली आहे. ठिकठिकाणी वस्तू विक्रीची दुकाने लागली आहेत. तरुणांकडून या वस्तू विशेषत: मोठ-मोठे झेंडे खरेदीकडे विशेष आकर्षण दिसत आहे. त्याचप्रमाणे ‘जय भीम’ लिहिलेली रिबीन, कागदी, कापडी, प्लास्टिक पताका, आकाश कंदील, काठ्या यांचीही मागणी वाढली आहे. बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे.
सार्वजनिक मंडळ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. रस्ते, चौक ठिक-ठिकाणी झेंडे, पताका कमानी उभारण्यासह विविध तयारी झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शाळा, महाविद्यालये, विविध कार्यालये तसेच, सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम होत असतात. यानिमित्ताने कोणकोणत्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे ते जाणून घ्या.
१. समाज सुधारक पुरस्कार वितरण समारंभ
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सव समिती चे वतिने देण्यात येणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज सुधारक पुरस्कार युवक क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष व जेष्ठ पुरोगामी नेते डॉ. कुमार सप्तर्षी यांना देण्यात येणार आहे.
वेळ :सायंकाळी ४:३० वा.
स्थळ :- गांधी भवन , कोथरुड , पुणे.
…
२. पुण्यात रेल्वे स्थानक येथे असणाऱ्या पुतळ्याजवळ भारिप बहुजन महासंघ, बहुजन समाज पक्ष, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिक पक्ष आठवले गट या अनेक संघटना आज रात्रीपासून विविध कार्यक्रम करणार आहेत. पुष्पहार अर्पण करून बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी वाहतुकीत देखील बदल करण्यात आला आहे.
…
३. जळगावात रेल्वे स्थानक येथे असणाऱ्या पुतळ्याजवळ बहुजन समाज पक्ष, वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिक पक्ष आठवले गट या अनेक संघटना तसेच समाजाचे लोकं १४ तारखेला रात्री विविध कार्यक्रम करणार आहेत. पुष्पहार अर्पण करून बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात येणार आहे.
संबंधित बातम्या