
ज्योतिषशास्त्रात राहु-केतू यांना अशुभ ग्रह म्हणून पाहिले जाते. जर कुंडलीत त्यांची स्थिती खराब असेल तर त्या व्यक्तीला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार घरात एक अशी दिशा असते, जिथे राहू आणि केतू वास्तव्य करतात. अशा स्थितीत घरातील त्या दिशेला काही गोष्टी ठेवणे टाळावे.
राहू-केतू घराच्या दक्षिण-पश्चिम दिशेला म्हणजेच, नैऋत्य दिशेला राहतात. अशा स्थितीत घरातील नैऋत्य दिशेला काही गोष्टी ठेवणे टाळले पाहिजे.
घराच्या नैऋत्य दिशेला पैसा किंवा तिजोरी वगैरे ठेवू नये. असे केल्याने तुम्हाला पैशाच्या समस्यांवना सामोरे जावे लागू शकते. यासोबतच सोने, चांदी किंवा इतर दागिने आणि मौल्यवान वस्तूही या दिशेला ठेवू नयेत. अन्यथा त्या व्यक्तीला नुकसान सहन करावे लागू शकते.
मंदिर हे घरातील सर्वात पवित्र स्थान आहे. अशा स्थितीत राहू-केतूच्या दिशेला म्हणजेच नैऋत्य दिशेला देवघर बांधू नये. कारण या दिशेने पूजा केल्याने व्यक्तीला पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही.
हिंदू धर्मात तुळशी ही केवळ एक वनस्पती नसून ती माता म्हणून पूजली जाते. अशा परिस्थितीत तुळशीचे रोप राहू आणि केतूच्या दिशेला म्हणजेच नैऋत्य दिशेला ठेवणे टाळावे. असे केल्याने सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कमी होऊ शकतो.
मुलांच्या अभ्यासाशी संबंधित वस्तू जसे की दप्तर, पुस्तके इत्यादी घराच्या नैऋत्य दिशेला ठेवू नयेत. तसेच या ठिकाणी अभ्यासिका बांधू नये. असे केल्याने मुलांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यात अडचणी येऊ शकतात.
सोबतच, राहू आणि केतूच्या दिशेला शौचालय बांधणे देखील चांगले मानले जात नाही. याची काळजी न घेतल्यास माणसाला अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या
