मराठी बातम्या  /  धर्म  /  Ratha Saptami 2023 : रथ सप्तमीला चुकूनही करु नका या चुका,अन्यथा…

Ratha Saptami 2023 : रथ सप्तमीला चुकूनही करु नका या चुका,अन्यथा…

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Jan 28, 2023 08:26 AM IST

Do & Don't On Ratha Saptami : पद्म पुराणानुसार या दिवशी पहिल्यांदाच सूर्याची किरणे पृथ्वीवर पडली. या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्याने सात महापापांपासून मुक्ती मिळते आणि मनुष्य गंभीर रोगांपासून मुक्त होतो.

रथसप्तमीला काय करु नये
रथसप्तमीला काय करु नये (हिंदुस्तान टाइम्स)

Ratha Saptami 2023

रथ सप्तमी हा भगवान सूर्याचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. यावेळी रथ सप्तमी शनिवार २८ जानेवारी २०२३ रोजी आहे. दरवर्षी हा सण माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी साजरा केला जातो. पद्म पुराणानुसार या दिवशी पहिल्यांदाच सूर्याची किरणे पृथ्वीवर पडली. या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्याने सात महापापांपासून मुक्ती मिळते आणि मनुष्य गंभीर रोगांपासून मुक्त होतो.

रथसप्तमीच्या दिवशी करु नका ही चूक

१- रथ सप्तमीच्या दिवशी स्वतःला क्रूरतेपासून दूर ठेवा आणि घरात शांतता राखा.

२- दारू पिऊ नका आणि तामसिक अन्न खाऊ नका.

३- घरातील वातावरण सौहार्दपूर्ण ठेवा.

४- या दिवशी ब्रह्मचर्य पाळा.

५- या दिवशी मीठाचे सेवन करू नये.

रथ सप्तमीला काय करावे

१- या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून ब्रह्म मुहूर्तावर गंगा नदीत स्नान करावे. जर हे शक्य नसेल तर पाण्यात थोडे गंगेचे पाणी टाका आणि त्या पाण्याने स्नान करा.

२- या दिवशी सूर्यदेवाची उपासना करा आणि रथ सप्तमी व्रत कथा ऐका.

३- सूर्यदेवांसमोर दिवा लावावा. असे केल्याने तुमचे नशीब जागृत होईल.

४- सूर्योदयाच्या वेळी तांब्याच्या भांड्यात सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. असे केल्याने तुमच्या कुंडलीत सूर्य बलवान होईल.

५- या दिवशी वस्त्र, अन्न इत्यादी गोष्टींचे दान केल्याने शुभ फळ मिळते.

६- घराच्या मुख्य दारावर आंब्याच्या पानांचं तोरण लावा.

सूर्यपूजेचा शुभ काळ कोणता

माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी सुरू होते - २७ जानेवारी रोजी सकाळी ९.१० वा.

माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी समाप्त होते - २८ जानेवारी रोजी ८.४३ मिनिटांनी.

उदय तिथीनुसार २८ जानेवारी २०२३ रोजी अचला सप्तमीचे व्रत पाळले जात आहे.

साध्य योग - २७ जानेवारी रोजी दुपारी १.२२ ते २८ जानेवारी रोजी सकाळी ११.५४ पर्यंत

शुभ योग - २८ जानेवारी सकाळी ११.५४ ते २९ जानेवारी सकाळी ११.०४ वा.

 

WhatsApp channel

विभाग