Diwali 2024: दिवाळीचा दिवस हिंदूंसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी लोक देवी लक्ष्मी आणि श्री गणेशाची पूजा करतात. दिवाळीत पूजा करत असाल किंवा नसाल, परंतु काही गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी काही गोष्टी केल्यास देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते. सायंकाळी दिवाळीची पूजा होते. त्यामुळे विशेषतः संध्याकाळी काही कामे करणे मात्र जरूर टाळा. चला जाणून घेऊया, दिवाळीत संध्याकाळी कोणकोणती कामे करू नयेत...
धार्मिक मान्यतेनुसार असे मानले जाते की देवी लक्ष्मी दिवाळीच्या संध्याकाळी भ्रमण करायला निघते. सूर्यास्तानंतर घराच्या कोणत्याही कोपऱ्यात अंधार पडणार नाही याची काळजी घ्या. दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी अंधाराचा घरातील सुख-समृद्धीवर वाईट परिणाम होतो.
मान्यतेनुसार दिवाळीच्या संध्याकाळी पैशांचा व्यवहार करणे चांगले नाही. विशेषतः अशा वेळी कोणीही अगदी छोटी रक्कमही उधार देऊ नये किंवा कोणाकडून कर्ज घेऊ नये. दिवाळीला घेतलेले कर्ज कधीच फेडले जात नाही, असे मानले जाते.
दिवाळीच्या संध्याकाळी कधीही घर किंवा आजूबाजूच्या परिसरात झाडू लावू नका. असे मानले जाते की या दिवशी संध्याकाळी जमिनीवर झाडू मारल्याने देवी लक्ष्मी नाराज होऊ शकते आणि पैशांचे नुकसान होऊ शकते.
दिवाळीच्या दिवशी चुकूनही मांस वगैरे खाऊ नये. या दिवशी तामसिक अन्नाचे सेवन केल्याने गणपती आणि लक्ष्मी माता नाराज होऊ शकतात.
तुळशी मातेला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीला स्पर्श केल्यास किंवा पाने तोडल्यास घरातील दारिद्र्य वाढण्याची शक्यता असते, असे म्हटले जाते. त्यामुळे देवी लक्ष्मीची कृपा कायम राखण्यासाठी दिवाळीला संध्याकाळी तुळशीला पाणी अर्पण करू नये किंवा त्यांना स्पर्श ही करू नये.
या दिवशी बहुतेक लोक भजन-कीर्तन, संध्याकाळी पूजा करतात. हिंदू धर्मात संध्याकाळी दिवाळी पूजनाचा नियम आहे. अशा वेळी सायंकाळी कलह व क्लेश टाळावे. यामुळे घरातील नकारात्मकता मोठ्या प्रमाणात वाढते.
दिवाळीच्या दिवशी कोणालाही दुखवू नये आणि वादविवादही टाळावा. कोणाचाही अपमान करणे किंवा कोणाची खिल्ली उडविणेही टाळा.
धार्मिक मान्यतेनुसार कोणत्याही सणाच्या वेळी काळे कपडे घालू नयेत. त्यामुळे दिवाळीत काळे कपडे घालणे टाळावे. देवी लक्ष्मी आणि गणेशाची असीम कृपा प्राप्त करण्यासाठी या दिवशी गुलाबी, लाल किंवा पिवळे कपडे परिधान करणे अत्यंत शुभ मानले जाते.
डिस्क्लेमर: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
संबंधित बातम्या