देशभर हिंदू बांधव आज २ नोव्हेंबर रोजी दिवाडी पाडव्याचा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. हिंदू धर्मात असलेल्या साडेतीन शुभ मुहूर्तांमधील अर्धा मुहूर्त म्हणजे हा दिवाळी पाडव्याचा दिवस आहे. दिवाळी च्या निमित्ताने एकमेकांना भेटवस्तू दिल्या जातात. आजच्या दिवशी सम्राट विक्रमादित्याने निर्माण केलेल्या कॅलेंडरचा पहिला दिवस असल्याने नववर्षाची सुरूवात देखील साजरी केली जाते.
गुजरात आणि महाराष्ट्रात नव्या विक्रम संवत्सराची सुरुवात कार्तिक शुद्ध प्रतिपदेला म्हणजे दिवाळीतल्या पाडव्याच्या दिवशी होते, याच दिवशी बलिप्रतिपदाही साजरी होते. त्यामुळे हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पती-पत्नीच्या नात्यासाठी दिवाळी पाडवा हा सण खास असतो. या दिवशी पतीचं औक्षण केले जाते. पती त्याच्या पत्नीसाठी ओवाळणी देतो. तिला खास वस्तू भेट म्हणून देतो.
या दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने नवी खरेदी केली जाते. घर, गाडी, सोनं खरेदीचा देखील हा एक महत्त्वाचा दिवस आहे. त्यामुळे आजच्या दिवाळी पाडव्याच्या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा देऊन दिवसाचा आनंद द्विगुणीत करूया.
ईडा पीडा टळो,
बळीचं राज्य येवो
सर्वांना बलिप्रतिपदा,
दिपावली पाडव्याच्या
खूप-खूप शुभेच्छा
…
आज बलिप्रतिपदा,
दिवाळीचा पाडवा.
राहो सदा नात्यात गोडवा.
दिवाळी पाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा
…
साडेतीन मुहूर्ताचे वलय आहे!
उत्तम दिनाचे महात्म्य आहे!
सुखद ठरो हा दिवाळी पाडवा,
त्यात असूदे अवीट गोडवा!
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
…
आज पवित्र पाडवा,
काल झालेले लक्ष्मीचे आगमन
अशा मंगल समयी
आपल्या मंगल भविष्याची पायाभरणी होवो
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
…
दिवाळी पाडव्याच्या या मंगलमय दिवसाच्या
तुम्हांला आणि तुमच्या परिवाराला
मनापासून शुभेच्छा!
…
सप्तजन्मीचे सात वचन,
साथ देणार तुला कायम
तुझ्या प्रेमाचीच ओढ राहील कायम
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा
…
आपुलकीच्या नात्यात मिळू दे फराळाचा गोडवा
सुखसमृद्धी घेऊन येतो दिवाळीचा पाडवा..
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
…
वर्षामागून वर्ष जाती,
बेत मनीचे तसेच राहती
पण तुझी साथ कधी न सुटती,
हीच इच्छा कायमस्वरूपी मनी
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!
दिवाळी सणाची सांगता भाऊबीजेने होते. रविवारी भाऊबीज असल्याने घराघरात उत्साहाचे तेज आले आहे. रविवारी भाऊबीजेचा सण आल्याने आनंदात भर पडली आहे. बहीण-भावाच्या नात्यातील ओलावा जपणार्या भाऊबीज सणासाठी बाजारात भेटवस्तूंचे प्रचंड वैविध्य आहे.