Diwali Lakshmi Pujan: दिवाळी लक्ष्मीपूजनाच्या आधी आणि नंतर चुकूनही कोणाला देऊ नका या गोष्टी, वाचा, का मानले जाते अशुभ?
मराठी बातम्या  /  धर्म  /  Diwali Lakshmi Pujan: दिवाळी लक्ष्मीपूजनाच्या आधी आणि नंतर चुकूनही कोणाला देऊ नका या गोष्टी, वाचा, का मानले जाते अशुभ?

Diwali Lakshmi Pujan: दिवाळी लक्ष्मीपूजनाच्या आधी आणि नंतर चुकूनही कोणाला देऊ नका या गोष्टी, वाचा, का मानले जाते अशुभ?

Oct 30, 2024 11:27 AM IST

Diwali Lakshmi Pujan Donts: दिवाळीला लक्ष्मीचे आगमन आणि स्वागतासाठी लोक आधीपासूनच तयारी सुरू करतात. कार्तिक अमावस्येच्या दिवशी घरांची साफसफाई करून देवी लक्ष्मी आणि गणपतीची पूजा केली जाते. या दिवशी संध्याकाळी पूजा केल्यानंतर आणि त्याआधी काही गोष्टींची काळजी घ्यावी असे शास्त्रात सांगितले आहे.

दिवाळी लक्ष्मीपूजनाच्या आधी आणि नंतर चुकूनही कोणाला देऊ नका या गोष्टी
दिवाळी लक्ष्मीपूजनाच्या आधी आणि नंतर चुकूनही कोणाला देऊ नका या गोष्टी

Diwali Lakshmi Pujan Donts: दिवाळीला लक्ष्मीचे आगमन आणि स्वागतासाठी लोक महिनाभर आधीपासूनच तयारी सुरू करतात. कार्तिक महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी घरांची साफसफाई करून देवी लक्ष्मी आणि गणपतीची पूजा केली जाते. यंदा दिवाळीच्या तारखेबाबत संभ्रम आहे. पंचांग फरकामुळे काही जण ३१ ऑक्टोबरला तर कुणी १ नोव्हेंबरला दिवाळी साजरी करत आहेत. अमावस्या तिथीमध्ये ३१ ऑक्टोबरला प्रदोष काळ येत आहे. या प्रदोष काळात पूजन केले जाते. या दिवशी संध्याकाळी पूजा केल्यानंतर आणि त्याआधी काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.

दूध, दही आणि त्यांपासून बनलेल्या पदार्थांचे दान करू नये

दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी दूध, दही आणि त्यांपासून बनवलेल्या वस्तू देऊ नयेत. या वस्तू दिल्यास घरातील मिळणारे लाभ, घराची समृद्धी निघून जाते, असे म्हटले जाते. दिवाळीनंतरही सायंकाळी दूधाचे दान करू नये अशी धार्मिक मान्यता आहे.

दिवाळीत मिठाचे दान करू नये

दिवाळीत कोणालाही मीठ दान करू नये. ज्योतिषशास्त्रानुसार मिठाचा संबंध शुक्र आणि चंद्र या ग्रहाशी आहे. त्यामुळे दिवाळीच्या दिवशी मीठ कोणालाही देऊ नये. यामुळे शुक्र ग्रह आपल्यासाठी वाईट होतो.

दिवाळीत हळद देऊ नये

हळदीचा उपयोग शुभ कार्यात केला जातो. हळदीचा त्याचा संबंध गुरू ग्रहाशी लावला गेला आहे. त्यामुळे हळदीचे दान केल्याने या दिवशी गुरू ग्रह आपल्यासाठी चांगला नसतो होतो. गुरू हा आपल्या जीवनातील धनाचा घटक मानला जातो.  म्हणूनच या दिवशी हळददान केल्याने त्याचा आपल्या घरातील धनावर विपरित परिणाम होतो असे मानले जाते.

दिवाळीत संध्याकाळी साखर देऊ नये

दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी कोणालाही साखर देऊ नये. असे म्हटले जाते की या दिवशी साखर दिल्याने किंवा दान केल्याने माता लक्ष्मी चिरस्थायी होत नाही, ती आपल्या घरातून निघूुन झाले. म्हणजेच आपल्या घरावर माता लक्ष्मीची कृपा राहात नाहीत. खरं तर साखर उसापासून बनविली जाते आणि ऊस देवी लक्ष्मीला प्रिय आहे. त्यामुळे या दिवशी साखरेचे दान करू नये, असेही म्हटले गेले आहे.

डिस्क्लेमर: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. या माहितीचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Whats_app_banner