Diwali Dipak Pujan : यावर्षी दिवाळीचा सण गुरुवार, ३१ ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे. शास्त्रानुसार दिवाळीची पूजा शुभ मुहूर्तावरच करावी. या दिवशी दीपपूजनही केले जाते. मान्यतेनुसार दिवाळीला देवी लक्ष्मी, गणेश, कुबेर या देवतांची पूजा केल्यास वर्षभर लाभ होतो. या दिवशी लोक दिव्यांची पूजा देखील करतात. चला तर मग जाणून घेऊया दिवाळीत दीपक पूजेची योग्य पद्धत.
महर्षी पराशर ज्योतिष संस्थेचे ज्योतिषी पंडित राकेश पांडे यांच्या नुसार, यावर्षी कार्तिक कृष्ण पक्ष अमावस्या तिथी गुरुवारी दुपारी ०३ वाजून ११ मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवारी संध्याकाळी संपेल. त्यामुळे धर्मशास्त्रानुसार ज्या दिवशी रात्रीच्या वेळी अमावस्या तिथी मिळते त्याच दिवशी दिवाळी साजरी केली जाते. गुरुवार, ३१ ऑक्टोबर रोजी दिवाळी साजरी केली जाणार आहे. दिवाळीला दीपोत्सवाबरोबरच लक्ष्मी, गणेश, कुबेर या देवतांची मनापासून पूजा करावी.
दिवाळीत दिव्यांची पूजा किंवा दीपक पूजन अत्यंत महत्त्वाची मानले गेले आहे. दीपक पूजनासाठी यासाठी दोन ताटांमध्ये दिवे ठेवा, दोन्ही ताटांमध्ये सहा चारमुखी दिवे सजवा. एकूण ३१ छोट्या दिव्यांमध्ये तेल आणि वाती टाकून ते प्रज्वलित करा. नंतर हाताते पाणी, अक्षत, पुष्प, रोली, दूर्वा, चंदन, अबीर, गुलाल अर्पण करा. भाताचा लावा अर्पण केल्यानंतर खालील मंत्रानंतर धूप आणि दिवे दाखवून सर्व साहित्यासह माता लक्ष्मी, गणेश आणि कुबेर यांची पूजा करावी. ॐ दीपमलिकै नम: हा तो मंत्र आहे.
या मंत्रानंतर आरती करावी. माता लक्ष्मी आणि कुबेर यांना प्रसन्न करण्यासाठी पूजास्थळाजवळ बसून श्रीसूक्त किंवा कनकधारा स्तोत्राचे पठण करावे. रात्री सरस्वती मातेचे ध्यान करताना सरस्वती देवीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी जरून वाचन करावे, तसेत काळ्या शाईने लिहावे.
सर्वोत्तम मुहूर्त वृषा लग्न सायंकाळी ०६.११ ते रात्री ०८.०८
मध्यरात्री सिंह लग्न - १२.३९ ते ०२.५३ वाजेपर्यंत वरील पूजा श्रद्धेने केल्याने देवी लक्ष्मीची कृपा अबाधित राहते.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.