Diwali lakshmi Puja: माता लक्ष्मीला सुखाची, धनाची आणि समृद्धीची देवी म्हटले जाते. म्हणूनच प्रत्येकाला आपल्या घरात लक्ष्मीचा वास असावा असे कायम वाटत असते. पण देवी लक्ष्मीचा स्वभाव तुम्हाला माहीतच असेल. तिचा त्यांचा स्वभाव चंचल आहे. देवी लक्ष्मी अस्थिर आहे, ती कधीही एका जागी राहत नाहीत. जाणून घ्या, देवी लक्ष्मीच्या या चंचलतेमागचे कारण काय आहे...
Diwali Lakshmi Puja: दरवर्षी कार्तिक अमावस्येच्या दिवशी दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दिवाळीपूर्वीच लोक लक्ष्मीपूजनाच्या तयारीला लागतात. हिंदू धर्मात माता लक्ष्मीला संपत्ती, वैभव, सुख आणि समृद्धीची देवी म्हटले जाते. त्यामुळे लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहावी आणि घरात तिचा वास असावा अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. परंतु सर्व देवी-देवता एकाच ठिकाणी वास्तव्य करत असताना माता लक्ष्मी मात्र एका ठिकाणी कधीच राहत नाही.
माता लक्ष्मीचा स्वभाव अतिशय चंचल असल्याचे धार्मिक शास्त्रांमध्ये सांगितले आहे. हे घराघरात म्हटलेही जात असते. आपल्या चंचल स्वभावामुळे देवी लक्ष्मी कधीही एका ठिकाणी जास्त वेळ थांबत नाही. आता माता लक्ष्मीच्या या चंचल स्वभावाचे रहस्य काय आहे ते जाणून घेऊया.
याबाबत एक पौराणिक कथा सांगितली गेली आहे. या पौराणिक कथेनुसार, नारद मुनींनी याबाबत एकदा ब्रह्माला विचारले होते. नारदमुनींच्या या प्रश्नाचे उत्तर देताना ब्रह्म म्हणाला की, देवी लक्ष्मीचा निवास एकाच ठिकाणी कायम असला तर माणूस गर्वाने भारावून जाईल आणि त्याचा परिणाम असा होईल की तो दुष्कर्म करू लागेल. भक्तांना त्यांच्या कर्मानुसार आणि परिश्रमानुसारच फळ मिळावे याच साठी देवी लक्ष्मीचा स्वभाव चंचल आहे.
देवी लक्ष्मी चंचल असण्याचे आणखी एक कारण सांगितले गेले आहे. हे कारण पाण्याशी संबंधित आहे. ते म्हणजे समुद्रमंथनाच्या वेळी माता लक्ष्मीचा जन्म पाण्यापासून झाला असा उल्लेख पुराणातआहे. पाणी स्थिर नसून ते सतत फिरत असते. हा पाण्याची स्वभाव आहे. पाण्याचा हाच गुणधर्म देवी लक्ष्मीच्या स्वभावात आढळतो. देवी लक्ष्मीही पाण्यासारखी स्थिर नसते, ती चंचल असते.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
संबंधित बातम्या