Diwali Lakshmi Mata Foot Prints: पंचांगानुसार, दिवाळी दरवर्षी कार्तिक महिन्यातील अमावास्येला साजरी केली जाते. दिवाळी हा दिव्यांचा सण आहे. या सणाच्या काळात प्रत्येक घर, रस्ते आणि परिसर दिव्यांनी उजळलेला दिसतो. दिवाळीच्या रात्री देवी लक्ष्मी आणि गणपतीची पूर्ण भक्तिभावाने पूजा केली जाते. यंदा ३१ ऑक्टोबरला दिवाळी साजरी होत आहे. असे मानले जाते की लक्ष्मी-गणेशाची पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी येते आणि जीवनात आनंद टिकून राहतो.
या दिवशी घरात लक्ष्मीच्या पावलांचे ठसे लावण्याचीही विशेष पद्धत आहे. अशा स्थितीत जाणून घ्या, दिवाळीला देवी लक्ष्मीच्या पावलांचे ठसे जमिनीवर कसे ठेवावेत. हे काम योग्य प्रकारे केल्यास कुटुंबाला लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल, अशी मान्यता आहे.
दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीच्या चरणस्पर्शाने घरात लक्ष्मीचे आगमन होते, असे मानले जाते. जेव्हा देवी लक्ष्मी घरी येते तेव्हा ती तिच्यासोबत सुख, समृद्धी आणि भरभराट घेऊन येते. लक्ष्मीमातेच्या येण्याने घरात धन-समृद्धी येऊ लागते आणि आर्थिक समस्या दूर राहतात. लक्ष्मी देवीच्या पावलांचे ठसे घरात लावण्यासाठी सहसा ते बाजारातून विकत घेतले जातात. दिवाळीच्या दिवसात सर्वत्र माते लक्ष्मीच्या पावलांच्या प्रतिकृती सर्वत्र उपबल्ध असतात.
माता लक्ष्मीचे पावले आपल्या घरातील मंदिराकडे जात आहेत अशा पद्धतीने आणि दिशेने लावावेत. अशा प्रकारे पावले लावणे खूप शुभ मानले जाते. मंदिराकडे जाताना देवी लक्ष्मीच्या पावलांनी देवी घरात प्रवेश करून घराच्या मंदिरात बसायला येत असल्याचे सूचित करते. जर देवी लक्ष्मी घरातील मंदिरात राहिली, तर ती कुटुंबावर कृपा ठेवते आणि त्यामुळे आपल्या घरात समृद्धी येते.
घरामध्ये लक्ष्मी देवीची पावले किंवा पावलांचे ठसे हे लाल, गुलाबी, पिवळ्या किंवा हिरव्या रंगाच्या असू शकतात. रंगीबेरंगी पावले लावणे हे देखील शुभ मानले जाते.
अनेक लोक देवी लक्ष्मीचे पाय सजावट म्हणून वापरतात. सजावटीसाठी, बहुतेक लोक घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर देवी लक्ष्मीच्या पावलांचे ठसे लावतात, परंतु हे योग्य मानले जात नाही. देवी लक्ष्मीचे पाय मुख्य प्रवेशद्वारावर ठेवल्याने जाणूनबुजून किंवा नकळत लोक पाय ठेवू शकतात. हा देवी लक्ष्मीचा अपमान मानला जातो आणि यामुळे देवी लक्ष्मी क्रोधित होऊ शकते. त्याचबरोबर स्नानगृह किंवा डस्टबिनजवळ देखील देवी लक्ष्मीची पावले लावू नयेत.