Diwali 2024: यंदाच्या दिवाळी सणाबाबत बराच संभ्रम आहे. बहुतांश पंचांगांमध्ये दिवाळीची तारीख ३१ ऑक्टोबर तर काही पंचांगांमध्ये १ नोव्हेंबर ही दिवाळीची तारीख सांगितली आहे. बहुतेक ज्योतिषींच्या मते शास्त्रांचा विचार केल्यास दिवाळी ३१ ऑक्टोबरला साजरी केली जावी. याचे कारण कारण या दिवशी प्रदोष कालात अमावस्या तिथी आलेली आहे. याच वेळेत देवी लक्ष्मीची पूजा केली जाते.
तुम्हीही माता लक्ष्मीची पूजा करत असाल तर लक्ष्मीमातेची मूर्ती खरेदी करताना अनेक गोष्टी लक्षात ठेवा. धार्मिक दृष्टीने त्याचे विशेष असे महत्त्व आहे आणि ते शास्त्राला धरूनही आहे. म्हणूनच दिवाळीसाठी लक्ष्मीमातेची मूर्ती खरेदी करताना खालील गोष्टी लक्षात घ्याव्यात-
सर्वप्रथम हे लक्षात ठेवा की फक्त देवी लक्ष्मीची मातीची मूर्ती आणा. मूर्ती खरेदी करताना लक्ष्मीमातेची मातीची मूर्ती खरेदी करा. कारण मातीची मूर्ती शुद्ध स्वरुपात असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लक्ष्मीमातेची घुबडावर बसलेली मूर्ती कधीही घरी आणू नये. घुबडांचा स्वभाव चंचल असतो. हे लक्षात घेता अशी मूर्ती घरी आणून तिची पूजा केल्याने पैसा आपल्याकडे येत नाही, किंवा आलेली पैसा टिकणार नाही, असे म्हटले जाते.
देवी लक्ष्मीचा चेहरा स्पष्ट दिसेल अशीच मूर्ती निवडावी. लक्ष्मीची उभी मूर्ती आणू नका. देवी लक्ष्मीसोबत गणेशाचीही पूजा केली जाते. त्यामुळे गणेशाची मूर्ती खरेदी करताना काळजी घ्या. ही मूर्ती कोठूनही तुटणार नाही याची काळजी घेण्याचीही गरज आहे.
माता लक्ष्मीची मूर्ती घराबाहेर कधीही ठेवू नये आणि आई लक्ष्मीची मूर्ती नेहमी घराच्या आत ठेवावी. याशिवाय लक्ष्मीमातेच्या पादुका घराबाहेर ठेवाव्यात. चरणपादुका घराच्या आतील बाजूलाही दिसायला हव्यात.
दिवाळी २०२४ गुरुवार, ३१ ऑक्टोबर रोजी
लक्ष्मी पूजा मुहूर्त- ३१ ऑक्टोबर, संध्याकाळी ०६:५२ ते ०८:४१
प्रदोष काल- संध्याकाळी ०६:१० ते ०८:५२
वृषभ काल- संध्याकाळी ०६:५२ ते रात्री ०८:४१
आमावस्या तिथी प्रारंभ- ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ०६:२२ वाजल्यापासून
आमावस्या तिथी ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ०८:४६ वाजता संपते
Disclaimer: या लेखात दिलेल्या माहितीवर आम्ही असा दावा करत नाही की हे पूर्णपणे खरी आणि अचूक आहे. या माहितीचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
संबंधित बातम्या