हिंदू धर्मात सण-उत्सवाला खास महत्व आहे. दिवाळीच्या सणाची प्रत्येकजण मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत असतो. यंदा दिवाळीचा पवित्र सण १ नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे. दिवाळीपूर्वी घराची साफसफाईही केली जाते. दिवाळीत देवी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते आणि ज्या घरात स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जाते त्या घरात देवी लक्ष्मी निवास करते.
वास्तुशास्त्रानुसार घरातील काही वस्तू खराब होणे किंवा तुटलेली-फुटलेली असणे अशुभ असते. तुमच्या घरातील कोणतीही वस्तू तुटली असेल तर ती दिवाळीपूर्वी दुरुस्त करून घ्या. चला जाणून घेऊया घरात कोणकोणत्या गोष्टी खराब झाल्या तर अशुभ असते. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर वास्तुशी संबंधित अनेक गोष्टी आहेत, ज्यांची विशेष काळजी घेतली पाहिजे.
दिवाळीच्या मुहूर्तावर स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जाते, दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मी भ्रमण करते आणि स्वच्छतेमुळे ती प्रसन्न होते, असे मानले जाते. ज्यामुळे घरात सुख, समृद्धी आणि शांती नांदते.
दिवाळीनिमित्त साफसफाई करताना घराचा प्रत्येक कोपरा स्वच्छ असेल आणि घरात कोणतीही रद्दी पडून राहणार नाही याची काळजी घ्या.
दिवाळीत साफसफाई करताना घरातील तुटलेली काच काढून टाकण्याची खात्री करा. हे देखील वास्तुनुसार शुभ नाही.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या देवघरात-घरात जुन्या मूर्ती किंवा तुटलेल्या-फुटलेल्या मूर्ती असतील तर त्याही काढून टाका. हे देखील शुभ मानले जात नाही.
घराचे दरवाजे दुरुस्त करा
वास्तुशास्त्रानुसार दरवाजा तुटणे अशुभ मानले जाते. घराचा दरवाजा तुटला असेल, आवाज येत असेल किंवा तडा गेला असेल तर दिवाळीपूर्वी दुरुस्त करून घ्या.
फर्निचर दुरुस्त करा
वास्तुशास्त्रानुसार तुटलेले फर्निचर घरामध्ये नकारात्मकता आणते. घरातील फर्निचरचे काही नुकसान झाले असेल तर ते दुरुस्त करा.
घड्याळ दुरुस्त करा
वास्तुशास्त्रात घड्याळाला खूप महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार, घड्याळ बंद पडल्याने घरातील वातावरण खराब होते. या दिवाळीपूर्वी तुमचे तुटलेले किंवा बंद पडलेले घड्याळ दुरुस्त करून घ्या.
इलेक्ट्रॉनिक्स वस्तू दुरुस्त करा
वास्तुशास्त्रानुसार खराब इलेक्ट्रॉनिक वस्तूंमुळे घरात नकारात्मकता येते. या दिवाळीपूर्वी घरात पडलेल्या खराब झालेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू दुरुस्त करा.
टीप : ही माहिती केवळ श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
संबंधित बातम्या