Diwali 2024: दिवाळीत लक्ष्मीमातेचे असे करा स्वागत, धनाची देवी होईल प्रसन्न! जाणून घ्या…
मराठी बातम्या  /  धर्म  /  Diwali 2024: दिवाळीत लक्ष्मीमातेचे असे करा स्वागत, धनाची देवी होईल प्रसन्न! जाणून घ्या…

Diwali 2024: दिवाळीत लक्ष्मीमातेचे असे करा स्वागत, धनाची देवी होईल प्रसन्न! जाणून घ्या…

Published Oct 20, 2024 10:33 AM IST

दिवाळी हा हिंदू धर्माचा महत्त्वाचा सण आहे. घर आणि परिसराला उजळणारा हा प्रकाशाचा सण कार्तिक महिन्यातील अमावास्येला साजरा केला जातो. हा सण म्हणजे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे पर्व. हा सण अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक असल्याचे मानले जाते. जाणून घेऊया या सणाला माता लक्ष्मीचे स्वागत कसे करावे.

दिवाळी लक्ष्मी पूजन
दिवाळी लक्ष्मी पूजन

Diwali 2024 Pooja Ritual: हिंदू धर्मात प्रत्येक सण आणि सणाचे स्वतःचे महत्त्व आहे. २०२४ मध्ये, दिवाळीचा सण गुरुवार, ३१ ऑक्टोबर 2024 रोजी साजरा केला जाईल. या दिवशी लोक लक्ष्मीमातेचे आणि गणेशाचे पूजन करता, तसेच त्यांचे स्वागत करण्याचीही तयारी करतात.

दिवाळीला माता लक्ष्मी आणि श्रीगणेशाचे पूजन केले जाते. या दिवशी लक्ष्मीमातेच्या स्वागतासाठी सर्वजण घर सजवतात आणि दिवे लावतात. दीपावलीच्या संध्याकाळी लक्ष्मीमाता आणि गणपतीची पूजा केली जाते. अशा या खास दिवशी लक्ष्मीमातेचे स्वागत कसे करायला हवे आणि धनाची देवी असलेल्या लक्ष्मीमातेला कसे प्रसन्न करून घ्यावे हे जाणून घेऊया.

 

लक्ष्मीमातेचे स्वागत कसे करावे?

 

घराची स्वच्छता

 

दीपावलीच्या दिवशी लक्ष्मीमातेचे स्वागत करण्यासाठी घर स्वच्छ असणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच या दिवशी सर्व प्रथम घराची स्वच्छता करून घ्या. त्याच प्रमाणे संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावायला विसरू नका. लक्ष्मीमातेचे स्वागत करायचे असल्याने या दिवशी संध्याकाळी घराचे दरवाजे उघडे ठेवा.

 

स्वस्तिक चिन्ह बनवा

 

लक्ष्मीमातेच्या स्वागतासाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक चिन्ह बनवा. असे केल्याने लक्ष्मीची कृपा घरावर राहते. याबरोबरच लक्ष्मीमातेच्या स्वागतासाठी घरी खास रांगोळी काढा. घर फुलं, दिवे आणि दिव्यांनी सजवा. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर फुलांच्या हार घाला आणि तोरण लावा. तसेच घरातील मंदिराची सुंदर सजावट करा.

 

चांदीच्या नाण्यांची पूजा आवश्य करा

 

शुभ मुहूर्त पाहून माता लक्ष्मी आणि श्रीगणेशाची पूजा करा आणि त्यांचा आशीर्वाद घ्या. पूजेच्या वेळी चांदीच्या नाण्यांची पूजा अवश्य करा. जे लोक या दिवशी देवी लक्ष्मीची पूर्ण भक्तिभावाने पूजा करतात, त्यांच्या घरी लक्ष्मीची कृपा वर्षभर राहते.

 

 

हिंदू धर्मात दिवाळीचा सण विशेष असा आहे. हा सण आपल्या जीवनात आनंद आणि प्रकाश घेऊन येतो. या काळात खऱ्या मनाने केलेल्या उपासनेने घरात सुख, समृद्धी आणि शांती नांदते.

 

दिवाळीत वाईटापासून रहा दूर, अन्यथा परत जाईल धनाची देवी

 

दिवाळीत लक्ष्मीमातेला प्रसन्न करण्यासाठी लोक अनेक उपाय करत असतात. मात्र काही कामे अशी आहेत जी टाळली नाहीत, तर धनाची देवी माता लक्ष्मी आल्या पावली परत जाते

लक्ष्मी माता प्रसन्न व्हावी यासाठी सूर्योदयापूर्वी उठावे. स्नान आटोपून पूजा करावी. त्याच प्रमाणे दिवाळीच्या दिवशी नखे आणि केस कापू नयेत. दिवाळीच्या दिवशी स्त्री आणि माता-पित्यांचा अपमान करू नये. घर स्वच्छ असावे. तसेच संध्याकाळी झाडूझटाका करू नये. उधारी करू नये. तसेच जुगार खेळू नये. या दिवशी चामड्यापासून बनलेल्या वस्तू आणि धारदार वस्तूं भेट म्हणून देऊ नयेत.

 

Disclaimer :  ही माहिती मान्यतांवर आधारित आहे. कोणत्याही माहितीची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. 

Whats_app_banner