दारिद्र्य दूर करण्यासाठी दिवाळीच्या रात्री करा हे खास उपास; माता लक्ष्मी तुमच्यावर होईल प्रसन्न
मराठी बातम्या  /  धर्म  /  दारिद्र्य दूर करण्यासाठी दिवाळीच्या रात्री करा हे खास उपास; माता लक्ष्मी तुमच्यावर होईल प्रसन्न

दारिद्र्य दूर करण्यासाठी दिवाळीच्या रात्री करा हे खास उपास; माता लक्ष्मी तुमच्यावर होईल प्रसन्न

Published Oct 26, 2024 06:00 PM IST

Diwali 2024: या वर्षी ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर या दोन्ही दिवशी दिवाळी साजरी केली जाईल. दिवाळीला देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही खास उपाय करता येतात, हे उपाय दिवाळीच्या रात्री करावेत, यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन घरात वास करते.

दारिद्र्य दूर करण्यासाठी दिवाळीच्या रात्री करा हे उपाय!
दारिद्र्य दूर करण्यासाठी दिवाळीच्या रात्री करा हे उपाय!

Diwali 2024: दिवाळी हा सण अधारावर प्रकाशाचा विजय, वाईटावर चांगल्याचा विजय, आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजयाचे प्रतिक म्हणून ओळखला जातो. दिवाळीचा सण हा विविध धार्मिक कार्यक्रम, देवीदेवतांशी जोडला गेला आहे. हा सण राम, लक्ष्मी, गणेश, विष्णू, कृष्ण, दुर्गा, शिव, काली, हनुमान, कुबेर, यम, यमी, धन्वंतरी आणि विश्वकर्मा यांच्याशी जोडला गेला आहे. दिवाळीचा सण हा धनधान्य आणि भरभराटीशी संबंधित आहे. तसेच तो दारिद्र्यावर मात करून धनवान होण्याचा देखील सण आहे. आपली दारिद्र्यता दूर करण्यासाठी दिवाळीच्या रात्री काही खास उपाय केल्यास दारिद्र्य नष्ट होईन संपन्नता येते अशी मान्यता आहे. पाहुयात , कोणते उपाय केल्याने दारिद्र्य नष्ट होते.

 

> दिवाळीच्या रात्री पाच सुपारी, पाच हळद, पाच गोवऱ्या आणि पाच गोमती चक्र घेऊन लाल कपड्यात बांधून लक्ष्मीपूजनाच्या ठिकाणी ठेवा. आता त्यांना घरी तिजोरीत ठेवा. असे मानले जाते की यामुळे पैशाची कमतरता दूर होते.

> दिवाळीत नवीन दिवा आणि तुपाचा दिवा लावणे उत्तम मानले जाते. घराच्या उत्तर दिशेला दिवा लावल्याने धनाची प्राप्ती होते. या दिशेकडून माता लक्ष्मी घरात प्रवेश करते.

> दिवाळीच्या दिवशी पितळेचा किंवा तांब्याचा कलश पाण्याने भरून त्यात आंब्याची किंवा अशोकाची पाने टाकून तोंडावर नारळ ठेवावा. नंतर रोळीसह कलशावर स्वस्तिक चिन्ह बनवा आणि गळ्यात माऊली बांधून लक्ष्मीपूजनाच्या ठिकाणी ठेवा. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते. गरिबी नष्ट होते.

> दिवाळीच्या रात्री १२ वाजता कोणतेही श्री सूक्त, लक्ष्मी चालीसा, कनकधारा स्तोत्राचे पठण करावे. असे मानले जाते की यावेळी देवी लक्ष्मी पृथ्वीवर फिरते आणि तिची पूजा कोण करत आहे हे पाहते. पूजा करणाऱ्यांवर लक्ष्मीची कृपा वर्षाव होते.

> दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या वेळी नऊ तोंडी तुपाचा दिवा लावा, यामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता निर्माण होते. आर्थिक स्थिती सुधारते.

> दिवाळीच्या रात्री गाईच्या तुपाचा दिवा नवीन मातीच्या दिव्यात लावून मंदिरात ठेवावा. त्यामुळे कर्जमुक्ती मिळते.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Whats_app_banner