Diwali Puja 2024: कार्तिक महिन्याच्या अमावस्येला म्हणजेच दिवाळीला महालक्ष्मीची पूजा करण्याचा नियम आहे. या दिवशी आपल्या पूर्वजांचे म्हणजेच पितरांचे स्मरणही केले जाते. त्यामुळे या दिवशी त्यांच्या नावाने दिवा लावून त्यांच्या नावाची पूजा केली जाते. या दिवशी लोक पितरांचे स्मरण करतात. त्याच प्रमाणे त्यांच्यासाठी कपडे आणि इतर साहित्याचे दान करतात. तसेच त्यांच्याकडे कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी आशीर्वाद देखील मागितला जातो.
वेगवेगळ्या ठिकाणी पूर्वजांची पूजा करण्याची परंपरा वेगवेगळी आहे. त्यामुळे आपल्या परंपरेनुसार पितरांची पूजा करून त्यांच्या नावाचे दिवे प्रज्वलित करावेत. प्रत्येक अमावास्येला पितरांची पूजा केली जात असली तरी कार्तिक अमावस्या ही मोठी अमावस्या असल्याने या दिवशी पितरांची विशेष पूजा केली जाते. तसेच त्यांच्यासाठी दान केले जाते.
येथे आम्ही तुम्हाला पितरांची पूजन करण्याची सामान्य पद्धत सांगत आहोत. या दिवशी सकाळी सर्वप्रथम पितरांनी खीर अर्पण करावी. दिवाळीच्या दिवशी सकाळी पितरांना अग्यारी आणि पुरी दिली जाते आणि त्यात खीर अर्पण केली जाते. त्यानंतर पाच मिठायांचा भोग लावला जातो. सगळीकडे आपापल्या परंपरा आहेत. त्यानुसार ही पूजा केली जाते.
सर्वप्रथम आपल्या पूर्वजांची दक्षिण दिशेची जागा नीट स्वच्छ करा. यानंतर पितरांच्या पूजेसाठी त्यात पांढरे कपडे, थोडे बताशे, नारळ, मखाना, दक्षिणा घालून बांधून त्या ठिकाणी ठेवावे. हे लक्षात ठेवा की कापड दीड मीटरपेक्षा कमी नसावे.
त्यानंतर आपल्या पितरांकडे मनापासून प्रार्थना करा. आता तुम्ही आम्हाला जे दिले त्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत, आमच्या घरी आशीर्वाद द्या आणि सुख-समृद्धी आणा, अशी मनापासून प्रार्थना करा. यानंतर तुमच्या पितरांच्या नावाने तुपाचा दिवा प्रज्वलित करून तो दक्षिण दिशेला ठेवावा. यानंतर दुसऱ्या दिवशी मंदिरात जाऊन एखाद्या ब्राह्मणाला या कापडासह साहित्य दान करावे.
कार्तिक मासाच्या अमावस्येला पितरांची पूजा केल्याने पितृदोषांपासून मुक्ती मिळते. खरं तर कार्तिक महिन्यातील अमावस्या आणि पितरांच्या पूजेला खूप महत्त्व आहे. म्हणून या दिवशी आवर्जून आपल्या पितरांची पूजा करावी असे म्हटले जाते.
डिस्क्लेमर: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. या माहितीचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा जरूर सल्ला घ्यावा.
संबंधित बातम्या