Lakshmi Pujan Muhurta : तुम्ही सुद्धा १ नोव्हेंबरलाच दिवाळी साजरी करताय? फक्त ४१ मिनिटांचा शुभ मुहूर्त!
मराठी बातम्या  /  धर्म  /  Lakshmi Pujan Muhurta : तुम्ही सुद्धा १ नोव्हेंबरलाच दिवाळी साजरी करताय? फक्त ४१ मिनिटांचा शुभ मुहूर्त!

Lakshmi Pujan Muhurta : तुम्ही सुद्धा १ नोव्हेंबरलाच दिवाळी साजरी करताय? फक्त ४१ मिनिटांचा शुभ मुहूर्त!

Nov 01, 2024 11:56 AM IST

Lakshmi Pujan Muhurta 2024 : दरवर्षी आश्विन महिन्याच्या अमावस्येला दिवाळीचा सण साजरा केला जातो. यंदा अमावस्या तिथीचे दोन दिवस असल्याने काही लोकांनी ३१ ऑक्टोबरला दिवाळी साजरी केली आहे, तर काही जण १ नोव्हेंबरला दिवाळी साजरी करणार आहेत.

लक्ष्मी पूजन मुहूर्त २०२४
लक्ष्मी पूजन मुहूर्त २०२४

वर्षातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी. दिवाळीत सर्वजण दिवे लावतात, घर सजवतात, मिठाई आणि पदार्थ बनवतात आणि दिवाळीची पूजा घरी करतात. दरवर्षी आश्विन महिन्याच्या अमावस्येला दिवाळीचा सण साजरा केला जातो. यंदा अमावस्या तिथीचे दोन दिवस असल्याने काही लोकांनी ३१ ऑक्टोबरला दिवाळी साजरी केली आहे, तर काही जण १ नोव्हेंबरला दिवाळी साजरी करणार आहेत. 

दिवाळीत माता लक्ष्मी आणि गणेशाची पूजा पूर्ण भक्तिभावाने केली जाते. असे मानले जाते की दिवाळीची पूजा पूर्ण केल्यानंतर कुटुंबाला लक्ष्मी आणि भगवान गणेशाची कृपा प्राप्त होते आणि जीवनात सुख-समृद्धी येते. दिवाळीला गणेश-लक्ष्मीची पूजा केल्याने घरात सुख-समृद्धी येते आणि धन आणि धान्याची कधीही कमतरता भासत नाही, असे मानले जाते. अशा परिस्थितीत दिवाळीत लक्ष्मीपूजनासाठी कोणती वेळ शुभ आहे? जाणून घेऊया, १ नोव्हेंबरला दिवाळी पूजेसाठी शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि साहित्य यादी-

लक्ष्मी पूजेचा मुहूर्त - 

सायंकाळी ०५.३६ ते सायंकाळी ०६.१६

कालावधी - ०० तास ४१ मिनिटे

प्रदोष काळ - ०५:३६ ते ०८:११

वृषभ काळ - सायंकाळी ०६:२० ते ०८:१५

पूजा साहित्याची यादी - 

कुंकू, कलावा, अक्षत, तांदूळ, कापूर, तुपाचा दिवा, मोहरीच्या तेलाचा दिवा, गंगाजल, नारळ, कलश, पूजा मांडण्यासाठी चौरंग, शंख, चांदीचे नाणे, फळे-(सिंघारा, केळी, सफरचंद, नारळ), खिल, बताशा, चंदन, तूप, लक्ष्मी-गणेशाची मूर्ती, , कुबेर देवता आणि माता सरस्वतीचे चित्र, मिठाई.

पूजा विधी :

दिवाळी पूजेला स्वच्छता महत्वाची आहे. घराची स्वच्छता करून गंगेचे पाणी शिंपडावे. रांगोळी, फुलांचे हार, केळी आणि अशोकाच्या पानांपासून घराची सजावट करावी. पूजेच्या ठिकाणी लाल सुती कापड पसरवावे. मध्यभागी थोडे तांदूळ ठेवा. चांदी किंवा तांब्याच्या कलशात पाणी ठेवा. या कलशात सुपारी, झेंडूचे फूल, एक नाणे आणि तांदळाचे काही दाणे घालावे. कलशावर एका वर्तुळात आंब्याची पाच पाने ठेवा. कलशाच्या उजव्या बाजूला नैऋत्य दिशेला गणपतीची मूर्ती किंवा फोटो आणि मध्यभागी लक्ष्मीमातेची मूर्ती किंवा चित्र ठेवावे. एका छोट्या ताटात तांदळाचा छोटा सपाट आकार तयार करून त्यावर हळद घालून थोडे पैसे टाकून मूर्तीसमोर ठेवावे. आपले हिशोबाचे पुस्तक, पैसे आणि व्यवसायाशी संबंधित इतर वस्तू मूर्तीसमोर ठेवा. टिळक लावा, फुले अर्पण करा आणि मूर्तींसमोर दिवे लावा. तळहातात फुले ठेवून डोळे बंद करून मंत्राचा जप करावा. हे फूल गणेश आणि लक्ष्मीला अर्पण करा. लक्ष्मीच्या मूर्तीला जलस्नानाच्या स्वरूपात पंचामृत अर्पण करा. मिठाई, हळद, कुंकू अर्पण करून देवीला हार अर्पण करा. अगरबत्ती किंवा धूप लावा, नंतर नारळ, सुपारी अर्पण करा. लक्ष्मी देवीची आरती करा. 

 

Whats_app_banner