Bhaubeej 2023: भाऊबीजच्या दिवशी भावाचे औक्षण करताना ताटात ठेवा ‘या’ गोष्टी; सुख- समृद्धी मिळेल!
Bhaubeej Date: यंदा भाऊबीज कधी साजरी केली जाईल, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
Bahubeej Puja Samagri List: दिवाळीनंतर कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीज हा सण साजरा केला जातो. याला यम द्वितीया असेही म्हणतात.या दिवशी बहिणी आपल्या भावाचे औक्षण करुन त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. हिंदू मान्यतेनुसार या दिवशी भावाने आपल्या बहिणीच्या घरी जाऊन जेवण करुन औक्षण केले तर अकाली मृत्यू होत नाही. यावर्षी १४ आणि १५ नोव्हेंबर भाऊबीज साजरी केली जाणार आहे. दरम्यान, भाऊबीजच्या दिवशी बहिणींनी ताटात नेमक्या कोणकोणत्या वस्तू ठेवाव्यात? हे जाणून घेऊ.
ट्रेंडिंग न्यूज
कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या तिथीला यम आपली बहीण यमुना हिच्या घरी जेवणासाठी गेला होता. अशा स्थितीत भावांनी बहिणीच्या सासरच्या घरी जावे. तर अविवाहित मुलींनी आपल्या भावाची घरीच ओवाळणी करावी. भाऊबीजच्या दिवशी सर्व प्रथम श्रीगणेशाचे ध्यान आणि पूजा करावी. भावाला ओवाळण्यासाठी बहिणींनी दिवाळीच्या फरळाचे ताट तयार करावे. तसेच भावाचे आवडते पदार्थही त्यात ठेवावे. बहिणींनी ओवाळल्यानंतर भावाने तिच्याकडून आशीर्वाद घेऊन तिला काही भेटवस्तू द्याव्यात.
औक्षण करताना ताटात कोणत्या गोष्टी ठेवायच्या?
भाऊबीजच्या दिवशी भावाला ओवाळताना बहिणींनी ताटात कुंकू, अक्षत:, फुले, सुपारी, चांदीचे नाणे, खोबरे, मिठाई, दुर्वा इत्यादी गोष्टी ठेवाव्यात. ज्याने सुख- समृद्धी मिळते, असे म्हटले जाते.
औक्षण करण्याची पद्धत
भावाला ओवाळण्यापूर्वी सर्वप्रथम एक ताट घ्यावे. शक्य असेल तर नवीन ताटाचा वापर करावा. हे ताट गंगाजलाने शुद्ध करावे. झेंडू किंवा इतर कोणतेही फूलांनी ताट सजवावे. यानंतर कुंकू, अक्षत:, फुले, सुपारी, चांदीचे नाणे, खोबरे, मिठाई, दुर्वा ताटात टाकावी. यासोबत तुपाचा दिवा लावा.
महत्त्वाचे
भाऊ दूजच्या दिवशी काहीही न खाता भावाचा टिळक लावणे शुभ मानले जाते. या दिवशी राहुकाळात भावाचे औक्षण करणे अशुभ मानले जाते. औक्षण करताना भावाला जमीनीवर बसवू नका. त्याला खुर्ची किंवा स्टूलवर बसवा. यानंतर त्याच्या डोक्यावर रुमाल किंवा एखादा कपडा टाका. या दिवशी भाऊ- बहिणींनी काळ्या रंगाचे कपडे घालणे टाळावे. या दिवशी आपापसात अजिबात भांडण करू नका. भावाचे औक्षण केल्यानंतर बहिणींनी शेवटी आरती करावी.
(डिस्क्लेमर- वरील लेखात दिलेली माहिती मान्यतांच्या आधारे देण्यात आलेली आहे. ती पूर्णपणे सत्य आणि योग्य असेलच असे आमचे म्हणणे नाही. त्यामुळे अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रांतील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
विभाग