Lakshmi Puja Wishes: लक्ष्मीपूजनाच्या शुभ दिवशी तुमच्या प्रियजनांना पाठवा 'या' खास शुभेच्छा-diwali 2023 lakshmi puja wishes message images quotes for whatsapp facebook instagram ,धर्म बातम्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  Lakshmi Puja Wishes: लक्ष्मीपूजनाच्या शुभ दिवशी तुमच्या प्रियजनांना पाठवा 'या' खास शुभेच्छा

Lakshmi Puja Wishes: लक्ष्मीपूजनाच्या शुभ दिवशी तुमच्या प्रियजनांना पाठवा 'या' खास शुभेच्छा

Nov 11, 2023 10:23 AM IST

Lakshmi Puja Wishes In Marathi: येत्या रविवारी १२ नोव्हेंबरला लक्ष्मीपूजनाचा सण साजरा केला जाणार आहे.

Lakshmi Puja Wishes 2023
Lakshmi Puja Wishes 2023

Lakshmi Puja 2023: कार्तिक महिन्यातील अमावस्या तिथीला दिवाळी साजरी केली जाते. यंदा १२ नोव्हेंबरला दिवाळी आहे. हिंदू धर्मात दिवाळी या सणाला विशेष महत्त्व आहे. दिवाळी. संपूर्ण भारतात वेगळाच उत्साह पाहायला मिळतो. दिवाळी हा सण आनंद आणि समृद्धी आणणारा सण मानला जातो. या दिवशी देवी लक्ष्मी आपल्या भक्तांना आशिर्वाद देते, अशी धार्मिक मान्यता आहे.

पौराणिक कथेनुसार समुद्रमंथनाच्या वेळी कार्तिक महिन्याच्या अमावास्येला देवी लक्ष्मी प्रकट झाली होती, तर वाल्मिकी रामायणानुसार या दिवशी माता लक्ष्मीचा विवाह भगवान विष्णूशी झाला होता. त्यामुळे दरवर्षी दिवाळीत लक्ष्मीपूजनाचे महत्त्व आहे. या दिवशी शुभ मुहूर्तावर लक्ष्मी-गणेश, कुबेर आणि माता सरस्वती यांची विशेष पूजा केली जाते. या दिवशी केरसुणी, बत्ताशे, पैसे, धान्य, कलश, इत्यादी गोष्टींना विशेष महत्व आहे. त्यामुळे, देवी लक्ष्मीच्या मूर्तीसोबत या गोष्टींचे खास पूजन केले जाते. ही पूजा योग्य पद्धतीने केल्याने आपल्या घरात सदैव माता लक्ष्मीची कृपा राहते, अशी देखील मान्यता आहे.

लक्ष्मीपूजेच्या खास शुभेच्छा

 

महालक्ष्मीचे करुनी पूजन,

लावा दीप अंगणी

धनधान्य आणि सुख-समृद्धी,

लाभेल तुम्हा जीवनी

लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा!

 

रांगोळीच्या सप्तरंगात

सुखाचे दीप उजळू दे,

लक्ष्मीच्या पावलांनी

घर सुख-समृद्धीने भरू दे

लक्ष्मीपूजनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

 

लक्ष्मीचा हात असो,

सरस्वतीची साथ असो,

गणरायाचा निवास असो,

आणि माता दुर्गाच्या आशीर्वादाने

आपले जीवन नेहमी उजळून राहो.

लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

तुम्हाला आई लक्ष्मीचा कायम आशीर्वाद मिळत राहो,

तुमच्या आयुष्यात आनंदाचे दिवस येत राहो,

लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

लक्ष्मीची होईल कृपा एवढी,

सगळीकडे होईल नाव

दिवसरात्र व्यापारात वाढेल तुमचे काम

लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा.

 

दिव्याचा प्रकाश, फटाक्यांचा आवाज,

सूर्यकिरण, आनंदाचा वर्षाव,

चंदनाचा सुगंध, प्रियजनांचे प्रेम

लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा.

रविवारी १२ नोव्हेंबरला लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त हा संध्याकाळी ५ वाजून ३१ मिनिटांनी सुरु होणार आहे. तर, रात्री ८ वाजून ३६ मिनिटांनी संपणार आहे. या कालावधीमध्ये लक्ष्मीची पूजा केल्याने घरात सदैव माता लक्ष्मीची कृपा राहते.

Whats_app_banner
विभाग