Bhaubeej Date: १४ की १५ नोव्हेंबर? नेमकी कधी आहे भाऊबीज? जाणून घ्या योग्य तिथी आणि शुभ मुहूर्त
Bhaubeej 2023 Correct Date: यावर्षी भाऊबीज कधी साजरी केली जाईल? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
Bhaubeej 2023 Date and Timing: हिंदू धर्मामध्ये दिवाळीचे खास महत्व आहे. आपल्या देशात दिवाळी मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरी केली जाते. /e ९ नोव्हेंबरपासून दिवाळीची सुरूवात झाली आहे. तर, भाऊबीजच्या सणाने दिवाळीची समाप्ती होणार आहे. मात्र, यावर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाची दुसरी तिथी १४ नोव्हेंबर रोजी दुपारी २.३५ वाजता सुरू होईल आणि १५ नोव्हेंबर रोजी एक वाजता समाप्त होईल. यामुळे नेमके भाऊबीज कधी साजरी करावी? असा अनेकांना प्रश्न पडला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
भाऊबीज हा सण भाऊ-बहिणीसाठी खूप खास असतो. या दिवशी बहिण भावाला ओवाळते तसेच त्याच्या त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. ही प्रथा शतकानुशतके जुनी आहे. या दिवशी विधीनुसार पूजा केल्याने आयुष्यभर यमाचे भय राहत नाही आणि कधीच अकाली मृत्यू येत नाही, असे मानले जाते.
योग्य तिथी आणि शुभ मुहूर्त
दरम्यान, उदया तिथीनुसार १५ नोव्हेंबरला भाऊबीजचा सण साजरा केला जाईल. भाऊबीजेचा शुभ मुहूर्त हा १५ नोव्हेंबरला दुपारी १. १० मि. सुरु होईल. तर, ३ वाजून २२ मिनिटांनी संपेल. या शुभ मुहूर्तावर तुम्ही भाऊबीज साजरी केली जाऊ शकते.
पौराणिक कथा
सूर्याचे पुत्र यम आणि यमुना हे भाऊ आणि बहीण होते. यमुनेने आपला भाऊ यमराजाला अनेकदा घरी येण्याची विनंती केली. एके दिवशी यमराज बहिण यमुनेच्या घरी गेला. त्या दिवशी कार्तिक शुद्ध द्वितीया होती. यावेळी यमुनेने यमराजाला भोजन दिले आणि औक्षण करून सुखी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. अशा स्थितीत भावांनी बहिणीच्या सासरच्या घरी जावे. तर अविवाहित मुलींनी आपल्या भावाची घरीच ओवाळणी करावी. भाऊबीजच्या दिवशी सर्व प्रथम श्रीगणेशाचे ध्यान आणि पूजा करावी. भावाला ओवाळण्यासाठी बहिणींनी दिवाळीच्या फरळाचे ताट तयार करावे. तसेच भावाचे आवडते पदार्थही त्यात ठेवावे. बहिणींनी ओवाळल्यानंतर भावाने तिच्याकडून आशीर्वाद घेऊन तिला काही भेटवस्तू द्याव्यात.
(डिस्क्लेमर- वरील लेखात दिलेली माहिती मान्यतांच्या आधारे देण्यात आलेली आहे. ती पूर्णपणे सत्य आणि योग्य असेलच असे आमचे म्हणणे नाही. त्यामुळे अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रांतील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
विभाग