Bhaubeej Wishes: तुमचे नातेवाईक, मित्र आणि प्रियजनांना पाठवा 'भाऊबीज'च्या खास शुभेच्छा!
Bhaubeej Wishes In Marathi: भाऊबीजच्या बहिण भावाला ओवाळते तसेच त्याच्या त्याच्या दीर्घायुष्याची कामना करते.
Diwali 2023: भाऊबीज हा सण कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या तिथीला साजरा केला जातो. रक्षाबंधनाप्रमाणेच हा सणही भाऊ-बहिणीसाठी खूप खास असतो. या दिवशी बहिण भावाला ओवाळते तसेच त्याच्या त्याच्या दीर्घायुष्याची कामना करते. ही प्रथा शतकानुशतके जुनी आहे. या दिवशी विधीनुसार पूजा केल्याने आयुष्यभर यमाचे भय राहत नाही आणि कधीच अकाली मृत्यू येत नाही, असे मानले जाते.
ट्रेंडिंग न्यूज
यावर्षी भाऊबीज येत्या १४ आणि १५ नोव्हेंबर २०२३ असे दोन दिवस साजरा केला जाणार आहे. पंचांगानुसार, कार्तिक महिन्याची शुक्ल द्वितीया तिथी १४ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी ०२:३६ पासून सुरुवात होत आहे. तर, १५ नोव्हेंबर २०२३ रोजी दुपारी ०१:४७ वाजता संपणार आहे.
भाऊबीजच्या मराठी शुभेच्छा
आली आज भाऊबीज
ओवाळते भाऊराया
नात्यामध्ये राहू दे स्नेह आणि आपुलकीची माया
भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा!
बहिणीची असते भावावर अतूट माया,
मिळो त्याला नेहमी अशीच प्रेमाची छाया,
भावाची असते बहिणीला साथ,
मदतीला देतो नेहमीच हात
भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा!
दिवाळीच्या पणतीला साथ असते प्रकाशाची
आणि भाऊबीजेला मला आस असते तुझ्या भेटीची.
भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा!
रक्षणाचे वचन,प्रेमाचे बंधन,
घेऊन आला हा सण,
भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा!
पहिला दिवा आज लागला दारी
सुखाची किरणे येई घरी
पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
सण बहीण भावाचा आनंदाचा उत्साहाचा निखळ मैत्रीचा,
भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
हिंदू धर्मात भाऊबीज सणाला खूप महत्त्वाचा मानला जातो. हा सण भाऊ-बहिणीतील प्रेम आणि समर्पणाचे प्रतीक असल्याचे म्हटले जाते. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या कपाळावर कुंकूवाचा तिलक लावतात. यमुना नदीच्या काठावर भाऊ- बहिणीने बसून भोजन केल्यास जीवनात समृद्धी येते, अशी श्रद्धा आहे.
विभाग