दर महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी साजरी केली जाते. ज्येष्ठ महिन्यातील विनायक चतुर्थी सोमवारी (१० जून) आहे. हा सण गणपतीला समर्पित आहे. या दिवशी गणेशाची पूजा केली जाते. यासोबतच अपेक्षित फळ मिळण्यासाठी उपवासही केला जातो. श्रीगणेशाला शरण गेलेल्या भक्तांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही.
यासोबतच उत्पन्न, सुख आणि सौभाग्य यामध्ये अपार वाढ होते. त्यामुळे भाविक गणेशाची भक्तिभावाने पूजा करतात. ज्योतिषांच्या मते, ज्येष्ठ महिन्यातील विनायक चतुर्थीला ध्रुव योगासह अनेक अद्भुत योगायोग घडत आहेत. या योगांमध्ये गणेशाची आराधना केल्याने साधकाला इच्छित वरदान मिळते. चला,तर मग शुभ मुहूर्त आणि योग जाणून घेऊया.
ज्योतिषांच्या मते, ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ९ जून रोजी दुपारी ०३:४४ वाजता सुरू झाली आहे. १० जून रोजी दुपारी ०४:१४ वाजता संपेल. विनायक चतुर्थीला चंद्रदर्शनाची वेळ ०२ तास ४७ मिनिटे आहे. त्याच वेळी, चंद्रास्त रात्री १०:५४ वाजता आहे. भक्त त्यांच्या सोयीनुसार गणेशाची आराधना करू शकतात.
ज्येष्ठ महिन्यातील विनायक चतुर्थीला धुव्र योग तयार होत आहे. हा योग दुपारी ०४:४८ वाजता समाप्त होईल. वर्षांनंतर विनायक चतुर्थीला ध्रुव योग जुळून येतो. या योगात श्रीगणेशाची उपासना केल्याने शाश्वत फळ प्राप्त होते.
ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला सर्वार्थ सिद्धी योगही तयार होत आहे. हा योग सकाळी ०५:२३ ते संध्याकाळी ०९:४० पर्यंत आहे. या काळात गणेशाची आराधना करणे अत्यंत फलदायी ठरेल.
विनायक चतुर्थीलाही रवियोग तयार होत आहे. रात्री ०९:४० वाजता रवीचे समापण होईल. त्याचबरोबर पहाटे ५.२३ पासून रवियोग तयार होत आहे. रवियोगात गणेशाची उपासना केल्याने व्यक्तीचे पद आणि प्रतिष्ठा वाढते.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती धार्मिक मान्यतांवर आधारित आहे. ती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे, असा हिंदुस्तान टाइम्स मराठीचा दावा नाही. त्यामुळं अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला जरूर घ्या.)