Happy Dhantrayodashi 2024 Wishes : दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनतेरस किंवा धनत्रयोदशी साजरी करण्याचा आहे. आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनतेरस साजरी करण्यात येते. पंचांगानुसार २९ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी आहे. या दिवशी धन्वंतरीची पूजा केली जाते. काही ठिकाणी या दिवशी लक्ष्मी देवीचीही पूजा करतात.
धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मी, कुबेर देव, गणेश आणि धन्वंतरी देव यांची पूजा केली जाते. तसेच यमदीप प्रज्वलित करण्याचे विशेष महत्त्व आहे.धनत्रयोदशीच्या विशेष मुहूर्तावर सोन्या-चांदीसह काही खास वस्तूंची खरेदी करणेही खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की यामुळे संपत्तीचे भांडार वर्षभर भरलेले राहते आणि जीवनात आनंद मिळतो.
शास्त्रानुसार या दिवशी भगवान धन्वंतरीचा जन्म झाला होता. यासाठी धनत्रयोदशीचा सण साजरा केला जातो. भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रगट झाले होते, त्यामुळे या दिवशी भांडी विकत घेण्याचीही प्रथा आहे. या दिवशी माता लक्ष्मी आणि कुबेराची पूजा करण्याची परंपरा आहे. धनतेरस निमित्त आपल्या प्रियजणांना हटके शुभेच्छा पाठवून दिवाळी सणाचा आनंद द्विगुणीत करा.
धनत्रयोदशीच्या सणापासून सुरुवात झाली दीपोत्सवाला
तुमच्या जीवनात अपार संपत्ती, सुख, समृद्धी आणि आनंद येवो.
तुम्हाला लक्ष्मी, गणेश आणि कुबेर देवतेचा आशीर्वाद मिळेल.
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
…
जीवनात फक्त प्रकाश असावा
तुमच्या सर्व आशा पूर्ण होवोत
देवी लक्ष्मी तुमच्यावर कृपा करो
सर्व बाजूंनी पैशांचा पाऊस पडो
धनत्रयोदशीच्या शुभेच्छा!
…
आपुल्या सदनी व्हावी बरसात धनाची..
आहे औचित्य दीपावलीचे,
बंधने जुळावी मनामनांची
धनतेरसच्या हार्दिक शुभेच्छा
…
जीवनात आनंद नांदो
लक्ष्मी देवीच्या कृपेने
धनत्रयोदशीला पैशाचा खजिना भरो
धनत्रयोदशीच्या शुभेच्छा!
…
धनत्रयोदशीला सुख-समृद्धीचा संगम होवो
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
…
आला आला दिवाळीचा सण
घेऊनी तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण
दिव्यांनी उजळून निघाली सारी सृष्टी
धन्वंतरीची कायम राहो तुम्हा सर्वांवर कृपादृष्टी
धनत्रयोदशी च्या हार्दिक शुभेच्छा!
…
धन्वंतरी आपणांवर सदैव प्रसन्न राहो,
निरायम आरोग्यदायी, जीवन आपणांस लाभो,
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो,
ही दिवाळी आपणास आनंद आणि भरभराटीची जावो…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा
…
दिव्यांची रोशणाई,
फराळाचा गोडवा,
असा हा धनत्रयोदशीचा सोहळा…
धनत्रयोदशीच्या मनपूर्वक शुभेच्छा
…
धनत्रयोदशीच्या दिवशी दिवा लागतो दारी,
कंदील पणत्यांनी उजळून निघते दुनिया सारी,
फराळ फटाक्यांची तर मजाच निराळी
मिळून सारे साजरे करू
आली रे आली दिवाळी आली
धनतेरसच्या खूप खूप शुभेच्छा