Dhanatrayodashi 2024: धनत्रयोदशीला सोने-चांदी खरेदीची परंपरा कशी सुरू झाली? भगवान धन्वंतरींशी आहे संबंध
मराठी बातम्या  /  धर्म  /  Dhanatrayodashi 2024: धनत्रयोदशीला सोने-चांदी खरेदीची परंपरा कशी सुरू झाली? भगवान धन्वंतरींशी आहे संबंध

Dhanatrayodashi 2024: धनत्रयोदशीला सोने-चांदी खरेदीची परंपरा कशी सुरू झाली? भगवान धन्वंतरींशी आहे संबंध

Published Oct 23, 2024 03:13 PM IST

Dhantrayodashi 2024: हिंदू धर्मात धनत्रयोदशीला सोने, चांदी इत्यादी खरेदी करण्याची परंपरा आहे. ही परंपरा कशी सुरू झाली हे पाहणे महत्त्वाचे आहे. या परंपरेचा देवांचा वैद्यराज भगवान धन्वंतरी यांच्याशी संबंध सांगितला जातो.

धनत्रयोदशीला सोने, चांदी खरेदीची परंपरा कशी सुरू झाली?
धनत्रयोदशीला सोने, चांदी खरेदीची परंपरा कशी सुरू झाली?

धनत्रदयीपासून पाच दिवसांच्या उत्सवाची सुरुवात होते. दरवर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्णपक्षाच्या त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. या शुभ प्रसंगी, प्रदोष काळात, देवी लक्ष्मी, कुबेर देव आणि भगवान धन्वंतरी यांची विधिपूर्वक पूजा करण्याची परंपरा आहे. ही पूजा केल्याने व्यक्तीला धनाची प्राप्ती होते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव राहतो, अशी धार्मिक मान्यता आहे. या दिवशी शुभ मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या वस्तू खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार या शुभ वस्तू खरेदी केल्याने साधक आणि त्याच्या कुटुंबीयांवर लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होते. आता पाहूया, धनत्रयोदशीला लोक सोन्या-चांदीच्या वस्तू का खरेदी करतात...

पंचांगानुसार यावेळी २९ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी साजरी होणार आहे. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी २९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजून ३१ मिनिटांपासून सुरू होईल. त्याच वेळी, ३० ऑक्टोबर रोजी दुपारी ०१ वाजून १५ मिनिटांनी समाप्त होईल. या दिवशी प्रदोष काल संध्याकाळी ०५ वाजून ३८ मिनिटे ते ०८ वाजून १३ मिनिटांपर्यंत आहे. या काळात धनाची देवी लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरी यांची पूजा करता येते.

या दिवशी सोने आणि चांदी खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी १० वाजून ३१ मिनिटांपासून ते दुसऱ्या दिवशी म्हणजेच ३० ऑक्टोबर रोजी सकाळी ०६ वाजून ३२ मिनिटाांपर्यंत आहे. या काळात खरेदी करणे शुभ मानले जाते.

का केली जाते सोने-चांदीची खरेदी ?

पौराणिक कथेनुसार, समुद्रमंथनाच्या वेळी भगवान धन्वंतरी प्रकट झाले. भगवान धन्वंतरी हे देवांचे वैद्य म्हणूनही ओळखले जातात. भगवान धन्वंतरी प्रकट झाले तेव्हा त्यांच्या हातात कलश होता. त्यामुळे दरवर्षी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर चांदीची लक्ष्मी, गणेश, भांडी, दागिन्यांची खरेदी केली जाते. याशिवाय सोने खरेदी करणे देखील शुभ मानले जाते. असे मानले जाते की धन्वंतरीला पितळ धातू आवडतो. यामुळेच या दिवशी पितळ धातूपासून बनवलेल्या वस्तूही खरेदी केल्या जातात.

Whats_app_banner