Dhantrayodashi 2024 : धनत्रयोदशीच्या दिवशी या ७ वस्तू खरेदी करणे अत्यंत शुभ, माता लक्ष्मी प्रसन्न होतील
मराठी बातम्या  /  धर्म  /  Dhantrayodashi 2024 : धनत्रयोदशीच्या दिवशी या ७ वस्तू खरेदी करणे अत्यंत शुभ, माता लक्ष्मी प्रसन्न होतील

Dhantrayodashi 2024 : धनत्रयोदशीच्या दिवशी या ७ वस्तू खरेदी करणे अत्यंत शुभ, माता लक्ष्मी प्रसन्न होतील

Updated Oct 28, 2024 04:20 PM IST

Dhantrayodashi 2024, Dhantrayodashi Shopping: धनत्रयोदशीच्या दिवशी शुभ मुहूर्त पाहून खरेदी केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार धनत्रयोदशीच्या दिवशी काही वस्तू खरेदी केल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होऊ शकते.

धनतेरसच्या दिवशी या 7 वस्तू खरेदी करणे अत्यंत शुभ!
धनतेरसच्या दिवशी या 7 वस्तू खरेदी करणे अत्यंत शुभ!

Dhantrayodashi 2024: यावर्षी धनत्रयोदशी मंगळवारी आहे. धनत्रयोदशी हा सण नेहमी त्रयोदशीच्या दिवशी साजरा केला जातो. यावेळी शुभ योगायोगामुळे धनत्रयोदशीचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढले आहे. धनत्रयोदशीला खरेदी करणे महत्वाचे मानले जाते. जगन्नाथ मंदिराचे पंडित सौरभ कुमार मिश्रा यांच्यानुसार, त्रिपुष्कर योग २९ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशीच्या दिवशी आहे. सकाळी ६ वाजून ३१ मिनिटांपासून ते १० वाजून ३१ मिनिटांपर्यंत हा योग आहे. त्याच दिवशी सकाळी ७ वाजून ४८ मिनिटांपर्यंत इंद्रयोग आहे. यानंतर वैधृति योगाची निर्मिती होत आहे. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र सायंकाळी ६ वाजून ३४ मिनिटांपर्यंत असेल, तर हस्त नक्षत्राची स्थापना होईल. या दिवशी शुभ मुहूर्त पाहून खरेदी केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, धनत्रयोदशीच्या दिवशी काही वस्तू खरेदी केल्यास देवी लक्ष्मी प्रसन्न होऊ शकते. जाणून घेऊया धनत्रयोदशीला कोणत्या वस्तू खरेदी करणे शुभ आणि अशुभ मानले जाते-

धनत्रयोदशीला या ७ वस्तू खरेदी करणे मानले जाते अतिशय शुभ

अख्खे धने 

जर तुमची आर्थिक स्थिती चांगली नसेल तर धनत्रयोदशीला तुम्ही अख्खे धने खरेदी करू शकता. त्यामुळे आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे.

झाडू

देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू खरेदी करावा. या दिवशी झाडू खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते.

सोने

धनत्रयोदशीला सोने खरेदी करणे फलदायी मानले जाते. यामुळे घरात सुख-समृद्धी वाढते.

चांदी

धनत्रयोदशीला चांदी किंवा चांदीचे दागिने खरेदी करणे अत्यंत शुभ असते.

वाहन

जर तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल तर धनत्रयोदशीला तुम्ही वाहन खरेदी करू शकता. धनत्रयोदशीला वाहन खरेदी करणे शुभ असते.

जमीन

धनत्रयोदशीला जमीन किंवा जमिनीशी संबंधित व्यवहार केल्यास सुख-समृद्धी वाढते.

श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र

जर तुम्हाला तुमच्या घरातील सुख आणि सौभाग्य वाढवायचे असेल तर धनत्रयोदशीला कुबेर यंत्र आणि श्रीयंत्र खरेदी करू शकता.

धनत्रयोदशीला काय खरेदी करू नये?

धनत्रयोदशीच्या दिवशी काही वस्तूंची खरेदी करणे शुभ मानले जात नाही. त्यामुळे या दिवशी काळे कपडे, लोखंडी, प्लॅस्टिक पासून बनवलेल्या वस्तू खरेदी करू नका. या दिवशी शनी, केतू आणि राहूशी संबंधित वस्तू खरेदी करणे टाळावे.

डिस्क्लेमर: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Whats_app_banner