दिवाळी हा सण दरवर्षी आनंद आणि समृद्धीचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. या काळात लोक त्यांच्या घरात सुख-समृद्धी आणण्यासाठी सोने, चांदी, वाहने आणि इतर मौल्यवान वस्तू खरेदी करतात. असे मानले जाते की, धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केल्यास त्याचे १३ पट अधिक फळ मिळते. तुम्ही धनत्रयोदशीला नवीन वाहन घेण्याचा विचार करत असाल तर हे नवीन वाहन शुभ मुहूर्तावरच खरेदी करावे.
धनत्रयोदशीचा संपूर्ण दिवस खरेदीसाठी शुभ मानला जातो, परंतु काही विशेष वेळ अशा असतात जेव्हा वाहन किंवा इतर मौल्यवान वस्तू खरेदी करणे खूप फायदेशीर मानले जाते. वास्तविक, धनत्रयोदशीला संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी कोणतीही वस्तू केवळ शुभ मुहूर्तावरच खरेदी करा. धनत्रयोदशीला वाहन खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त कधी आहे ते जाणून घ्या.
शुभ काळात कोणतेही काम करण्यावर भर दिला जातो कारण या काळात जवळपास सर्व ग्रह शुभ स्थितीत राहतात. यावेळी तुम्हाला धनतेरसला खरेदीसाठी दोन दिवस मिळणार आहेत. वास्तविक, यावेळी त्रयोदशी तिथी २९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजून ३२ मिनिटे ते ३० ऑक्टोबर रोजी दुपारी १ वाजून १६ मिनिटापर्यंत असेल. त्रयोदशीलाच धनत्रयोदशीचा सण साजरा करण्याची परंपरा आहे. यावेळी २९ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशीचा सण साजरा केला जाणार आहे. पण, ज्यांना वाहन घ्यायचे आहे त्यांच्याकडे २ दिवसांचा वेळ असेल.
पंचांगानुसार मंगळवार २९ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशीला कार खरेदी करण्यासाठी चार शुभ मुहूर्त आहेत.
चल चौघडिया, सकाळी ९:३२ ते १०:५८ ही वेळ शुभ आहे. परंतु, तुम्ही १० वाजल्यानंतरच खरेदी केल्यास ते तुमच्यासाठी उत्तम राहील.
शुभ चौघडिया दुपारी ३:१७ ते ४:४३ पर्यंत
लाभ चौघडिया सकाळी १० वाजून ५८ मिनिटे ते दुपारी १२ वाजून २४ मिनिटापर्यंत.
याशिवाय, तुम्ही संध्याकाळी ७:४३ ते ९:१७ या वेळेत कार किंवा इतर कोणतेही वाहन देखील खरेदी करू शकता.
शुभ चौघडिया सकाळी ६.३१ ते ७.५४ पर्यंत
अमृत चौघडिया सकाळी ७.५४ ते ९.१८ पर्यंत.
यावेळी, त्रयोदशी तिथी दोन दिवसांची असल्याने, तुम्ही ३० ऑक्टोबरलाही काही काळासाठी धनत्रयोदशीची खरेदी करू शकता. त्रयोदशी तिथी २९ ऑक्टोबर रोजी प्रारंभ होत आहे आणि प्रदोष काळात पूजेचे महत्व असल्यामुळे त्याच दिवशी पूजा केली जाईल. परंतू दुसऱ्या दिवशी म्हणजेच ३० ऑक्टोबर रोजी त्रयोदशी तिथी दुपारी १:१६ पर्यंत राहील त्यामुळे तुम्ही वाहन या वेळेपर्यंत कधीही खरेदी करू शकता.
संबंधित बातम्या