Dhanatrayodashi 2024 : धनत्रयोदशीचा सण दरवर्षी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या त्रयोदशी तिथीला साजरा केला जातो. द्रिक पंचांगानुसार यावर्षी धनत्रयोदशी २९ ऑक्टोबर २०२४ रोजी आहे. हिंदू धर्मात धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदी आणि पितळ-तांब्याची भांडी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू तेरा पटीने वाढतात आणि जीवनात धनप्राप्ती होते असे मानले जाते, परंतु या खास प्रसंगी काही वस्तू खरेदी करणे शुभ मानले जात नाही. धनत्रयोदशीला या वस्तू खरेदी करणे टाळा. जाणून घेऊया धनत्रयोदशीला काय खरेदी करू नये?
लोखंडी भांडी : धनत्रयोदशीच्या दिवशी भांडी खरेदी करताना अनेकदा लोखंडापासून बनवलेल्या वस्तू खरेदी करणे टाळावे. याबरोबरच स्टील किंवा ॲल्युमिनियमची भांडी खरेदी करू नयेत.
काळ्या रंगाच्या वस्तू : धनत्रयोदशीच्या दिवशी काळ्या रंगाच्या वस्तू जसे बॅग, कपडे, शूज, ब्लॅक ब्लँकेट इत्यादी खरेदी करणे शुभ मानले जात नाही.
काचेच्या वस्तू : धनत्रयोदशीच्या दिवशी काचेपासून बनवलेल्या वस्तू खरेदी करू नयेत, असे मानले जाते. या दिवशी काचेची भांडी किंवा सजावटीच्या वस्तू खरेदी करू नका.
धारदार वस्तू : या दिवशी चाकू, कात्री, सुया यांसह कोणत्याही धारदार वस्तू खरेदी करू नका.
कृत्रिम दागिने : धनत्रयोदशीच्या दिवशी सोन्या-चांदीपासून बनवलेले दागिने खरेदी करणे शुभ असते. परंतु या दिवशी कृत्रिम दागिने खरेदी करू नका.
प्लॅस्टिकच्या वस्तू : धनत्रयोदशीच्या दिवशी प्लॅस्टिकपासून बनवलेल्या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जात नाही.
डिस्क्लेमर: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
संबंधित बातम्या