धनत्रयोदशीचा दिवस विशेषत: समृद्धी, आरोग्य आणि आनंदाचीसाठी साजरा केला जातो. यावेळी २९ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी मोठ्या थाटात साजरी केली जाणार आहे. हा सण दिवाळीच्या पाच दिवसांच्या सणाची सुरुवात करतो. या दिवशी धनाची देवी लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते.
धनतेरसला धनत्रयोदशी असेही म्हणतात. दिवाळीतील धनत्रयोदशी किंवा धनतेरस दोन शब्दांपासून बनलेली आहे, पहिला शब्द 'धन' म्हणजे संपत्ती आणि दुसरा 'तेरस किंवा त्रयोदशी'. धनतेरसचा दिवस धन्वंतरी त्रयोदशी किंवा धन्वंतरी जयंती म्हणूनही साजरा केला जातो. भगवान धन्वंतरी हे आयुर्वेदाचे देव मानले जातात.
धनत्रयोदशी तिथीची सुरुवात २९ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १० वाजून ३१ मिनिटांपासून होईल. ते धनत्रयोदशीची समाप्ती ३० ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी १ वाजून १५ मिनिटांनी होणार आहे. मात्र उदया तिथीनुसार, धनत्रयोदशी २९ ऑक्टोबरला साजरी केली जाईल.
धनत्रयोदशीचा मुहूर्त हा विधी आणि पूजा करण्यासाठी एक महत्त्वाचा काळ मानला जातो. पंचांगानुसार, यंदा पूजेचा शुभ मुहूर्त २९ ऑक्टोबरला संध्याकाळी ७ वाजून ४ मिनिटे ते ८ वाजून २७ मिनिटापर्यंत असेल, अशात तुम्हाला पूजा करण्यासाठी सुमारे १ तास २३ मिनिटांचा वेळ मिळेल. यादिवशी प्रदोष काळ – १७:३८ ते २०:१३ मिनिटापर्यंत राहील.
धनत्रयोदशीला दागिने, भांडी आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे. असे मानले जाते की, या दिवशी सोने, चांदी आणि धातूची भांडी खरेदी केल्याने घरात सुख-समृद्धी आणि धन-संपत्तीची प्राप्ती होते. म्हणूनच लोक या दिवशी सोन्या-चांदीचे दागिने, भांडी आणि घरगुती वापरासाठी इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करतात.
धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणे शुभ असते. विशेषत: ज्या वस्तू घरातील स्थिरता आणि समृद्धीचे प्रतीक मानल्या जातात. दागिने, विशेषत: सोन्या-चांदीचे दागिने हे शुद्धता आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. हे खरेदी केल्याने देवी लक्ष्मी घरात येते. स्टील, तांबे, पितळ किंवा चांदीची भांडी खरेदी करणे देखील शुभ असते. ते कौटुंबिक आरोग्य आणि आनंद आणि समृद्धीचे प्रतीक मानले जातात. आधुनिक काळात लोक टीव्ही, वॉशिंग मशिन, फ्रीज, एसी आणि इतर मशीन यांसारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे देखील खरेदी करतात. धनत्रयोदशीच्या दिवशी या वस्तूंची खरेदी करून लोक आपल्या जीवनात सुख आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतात.
संबंधित बातम्या