
Dhanteras 2023 wishes: दरवर्षी कार्तिक कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशीचा सण साजरा केला जातो. या तिथीला भगवान धन्वंतरी सोन्याचे भांडे घेऊन प्रकट झाले होते, असे म्हटले जाते. यावर्षी येत्या १० नोव्हेंबरला धनत्रयोदशीचा सण साजरा केला जाईल. धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन वस्तूंच्या खरेदीला विशेष महत्त्व असते. धनत्रयोदशीला खरेदी केल्यास त्याच्या घरात सुख-समृद्धी येते, अशी श्रद्धा आहे. अशा शुभ दिवशी तुमचे नातेवाईक, मित्र आणि जवळच्या लोकांना खास शुभेच्छा पाठवून त्यांच्या आनंदात आणखी भर घालता येईल.
पौराणिक कथेनुसार, अमृत मिळविण्यासाठी देव आणि दानवांनी समुद्रमंथन केले, तेव्हा त्यातून एक- एक करून चौदा रत्ने प्राप्त झाली. समुद्रमंथनानंतर सर्वात शेवटी अमृत प्राप्त झाले. असे म्हटले जाते की, भगवान धन्वंतरी हातात अमृताचे भांडे घेऊन समुद्रातून प्रकट झाले. त्या दिवशी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी होती. यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा करण्याची परंपरा आहे.
धन धान्याची व्हावी
घरीदारी रास,
राहो सदैव लक्ष्मीचा
तुमच्या घरी वास
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
धनं धान्यं पशुं बहुपुत्रलाभं
सत्सम्वत्सरं दीर्घमायुरस्तु
अमृतमयी मंगलमय हो
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
आला आला दिवाळीचा सण...
घेऊनी तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण
दिव्यांनी उजळून निघाली सारी सृष्टी...
धन्वंतरीची कायम राहो तुम्हा सर्वांवर कृपादृष्टी
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
घरी लक्ष्मीचा वास असो आप्तेष्टांची सदैव साथ असो...
ही धनत्रयोदशी आपणांस खास असो...
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा...!
कुबेराची धनसंपदा आणि धन्वंतरीची आरोग्यसंपदा तुमच्यावर सदैव प्रसन्न राहो,
दीपावली निमित्ताने समृद्धी आणि निरामय आरोग्याचे दान मिळो...
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
धनत्रयोदशीच्या शुभदिनी,
आपुल्या सदनी व्हावी बरसात धनाची..
करोनि औचित्य दीपावलीचे,
बंधने जुळावी मनामनांची
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा!
संबंधित बातम्या
