Dhanatrayodashi shopping subh muhurt: दिवाळी हा सण म्हटला की घर, दागदागिने, मौल्यवान वस्तू, गाड्या, कपडे यांची खरेदी आलीच. दिवाळीचे पाच दिवसांचे पर्व धनत्रयोदशीपासून सुरू होते. या दिवसांमध्ये आपल्या आर्थिक क्षमतेनुसार लोक खरेदी करत असतात. या दिवसांमध्ये लोक नवे सामान खरेदी करतातच. मात्र ही खरेदी जर शुभ मुहूर्तावर केली गेली तर घरात सुखसमृद्धी येते अशी मान्यता आहे. हे पाहता धनत्रयोदशीच्या अशा ३ शुभ मुहूर्तांवर शॉपिंग करून तुम्ही केवळ नवीन सामानाचीच खरेदी करणार नाहीत, तर घरात धनाची देली महालक्ष्मीलाही घेऊन येत असता.
पंचांगाचा विचार केल्यास या वर्षी धनत्रयोदशी २९ ऑक्टोबर या दिवशी आहे. या दिवशी खरेदीचा पहिला शुभ मुहूर्त सकाळी ७ वाजून ५० मिनिटांपासून ते सकाळी १० वाजेपर्यंत आहे. तर, दुसरा शुभ मुहूर्त दुपारी २ वाजल्यापासून ते दुपारी ३ वाजून ३० मिनिटांपर्यंत असेल. तसेच, तिसरा शुभ मुहूर्त हा संघ्याकाळी ६ वाजून ३६ मिनिटांपासून ते रात्री ८ वाजून ३२ मिनिटांपर्यंत असणार आहे.
असे म्हटले जाते की, धनत्रयोदशीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर खरेदी केली गेली, तर माता महालक्ष्मीचे आगमन होते. मातेच्या आगमनामुळे घरात सुखसमृद्धी आणि आनंद राहतो.
धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरीसह माती लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर यांची पूजा केली जाते. या दिवशी विधिवत पूजा करून जातकांना चागल्या आरोग्याची देखील प्राप्ती होत असते.
धनत्रयोदशी ही कार्तिक कृष्ण त्रयोदशी, अर्थात कार्तिक महिन्याच्या १३ व्या दिवशी असते. या दिवशी देवाचा वैद्य धन्वंतरी याचा जन्म झाला. यामुळे या दिशी लोक धन्वंतरीची पूजा करतात. तेच अनेक लोक धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मीमातेची पूजा करतात
धनत्रयोदशीला छोटी दिवाळी असेही म्हटले जाते. या दिवशी यमराजाला प्रसन्न करून घेण्यासाठी दीपदान केले जाते. पद्म पुराण उत्तरखंड, अध्याय क्रमांक १२४ नुसार कार्तिक महिन्यात्या कृष्णपक्षाच्या त्रयोदशीला घराच्या बाहेर यमराजासाठी दीप उजळले जातात. यामुळे अकाली मृत्यू येत नाही अशी धार्मिक मान्यता आहे.
धनत्रयोदशी, दिनांक २९ ऑक्टोबर २०२४
पहिला शुभ मुहूर्त- सकाळी ७ वाजून ५० मिनिटांपासून ते सकाळी १० वाजेपर्यंत.
दुसरा शुभ मुहूर्त- दुपारी २ वाजल्यापासून ते दुपारी ३ वाजून ३० मिनिटांपर्यंत.
तिसरा शुभ मुहूर्त- संघ्याकाळी ६ वाजून ३६ मिनिटांपासून ते रात्री ८ वाजून ३२ मिनिटांपर्यंत.
संबंधित बातम्या