Dhanteras Shopping : २९ ऑक्टोबरला धनत्रयोदशी, या दिवशी काय-काय खरेदी करावे जाणून घ्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  Dhanteras Shopping : २९ ऑक्टोबरला धनत्रयोदशी, या दिवशी काय-काय खरेदी करावे जाणून घ्या

Dhanteras Shopping : २९ ऑक्टोबरला धनत्रयोदशी, या दिवशी काय-काय खरेदी करावे जाणून घ्या

Published Oct 23, 2024 11:50 AM IST

Dhanteras 2024 Shopping In Marathi : हिंदू धर्मात दिवाळी या सणाला खास महत्व आहे. धनत्रयोदशी किंवा धनतेरस या सणाने दिवाळीची सुरवात होते. धनतेरसच्या दिवशी प्रामुख्याने खरेदीला खास महत्व आहे. धनतेरसला काय-काय खरेदी करणे शुभ-लाभाचे ठरते ते जाणून घ्या.

धनतेरसला काय-काय खरेदी करावे
धनतेरसला काय-काय खरेदी करावे

Dhanatrayodashi 2024 Shopping : दरवर्षी दिवाळीपूर्वी धनत्रयोदशीचा सण साजरा केला जातो. या दिवशी धनाची देवता कुबेर आणि धन्वंतरी यांची पूजा केली जाते. या दिवशी प्रामुख्याने खरेदी केली जाते. धनत्रयोदशी आणि छोटी दिवाळी कधी साजरी केली जाईल आणि धनत्रयोदशीला काय खरेदी करावे हे जाणून घेऊया.

आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. यावेळी मंगळवार २९ ऑक्टोबर रोजी धनतेरस साजरा होणार आहे. या दिवशी सोन्या-चांदीचे दागिने आणि नवीन भांडी खरेदी करण्याची परंपरा शतकानुशतके चालत आलेली आहे. धनत्रयोदशीचा सण भगवान धन्वंतरीचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो. या दिवशी धनाची देवता कुबेरासह धनाची देवी लक्ष्मी आणि गणेशाची पूजा केली जाते.

धनत्रयोदशीला काय खरेदी करावे?

धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर घरात नवीन झाडू आणल्यास, देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि वर्षभर संपत्ती आणि समृद्धी वाढवण्याचा आशीर्वाद देते. 

विड्याची पाने देवी लक्ष्मीला विशेष प्रिय मानली जातात. त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी ५ विड्याची पाने नक्की खरेदी करा. ही पाने घेऊन ती देवी लक्ष्मीला अर्पण करा आणि दिवाळीचा सण संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी ही पाने पाण्यात वाहून द्या.

धनत्रयोदशीच्या दिवशी आपण आपल्या घरी बताशे आणणे आवश्यक आहे. लक्षात ठेवा की तुम्ही नेहमी नवीन बताशे आणावेत. जुने बताशे पूजेत ठेवू आणि देऊ नये. धनत्रयोदशीला घरात नवीन बताशे आणल्याने वर्षभर घरात धन आणि धान्याची कमतरता भासत नाही.

देवी लक्ष्मीला धणे अर्पण करा. हे धणे आपल्या धनस्थानावर ही ठेवा. असे केल्याने आपल्या सर्वांना देवी लक्ष्मीची कृपा सदैव प्राप्त होईल. धणे हे समृद्धीचे प्रतीकही मानले जाते. लक्षात ठेवा हे धणे जेवणात वापरू नये. तुमची इच्छा असेल तर तुम्ही हे धणे दिवाळीनंतर गायीला खाऊ घालू शकता.

धनत्रयोदशीच्या दिवशी अनेकजण रोजच्या वापरातील नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू घरात आणतात. या दिवशी यमदिपही लावला जातो.

छोटी दिवाळी कधी आहे- 

छोटी दिवाळी, हनुमान जयंती, नरक चतुर्दशी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्दशी तिथीला साजरी केली जाते. यावेळी ३१ ऑक्टोबर रोजी छोटी दिवाळी साजरी होणार आहे. याला नरक चतुर्दशी असेही म्हणतात. यादिवशी सकाळी लवकर उठून अभ्यंगस्नान करायलाही खास महत्व आहे.

टीप : ही माहिती केवळ श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

 

Whats_app_banner