देवशयनी एकादशीपासून भगवान विष्णू चार महिने योगझोपेत जातात. याच चार महिन्यांना चातुर्मास म्हणतात. या काळात लग्न आणि इतर शुभ कामं होत नाहीत. आता देवउठनी एकादशीपासून ही थांबलेली सर्व शुभ कार्य पुन्हा सुरू होतील. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला कार्तिकी एकादशी, देव उठनी, प्रबोधिनी, देवोत्थानी आणि देवोत्थान एकादशी म्हणून ओळखली जाते.
प्रबोधिनी एकादशी मंगळवार १२ नोव्हेंबर रोजी साजरी होणार आहे. यानिमित्ताने भाविक उपवास करतात. मंत्रोच्चारासह भगवंतांना विधिवत झोपेतून उठवले जाते. असे मानले जाते की कार्तिक महिन्याच्या देवउठनी एकादशीला भगवान विष्णू क्षीरसागरात चार महिने विश्रांती घेतल्यानंतर या तिथीला उठतात आणि पुन्हा सृष्टीचे कार्य आपल्या हाती घेतात.
चातुर्मासाची सांगता देवउठनी एकादशीने होते आणि या दिवसापासून विवाह, यज्ञोपवीत, मुंडन, गृह प्रवेश इत्यादी सर्व शुभ कार्यांची सुरुवात होते. या दिवशी तुळशीविवाहाची ही परंपरा आहे. तुळशीचा विवाह शालिग्रामशी लावण्यात येतो. भगवान विष्णूशी तुळशीच्या विवाहाने लग्नकार्याची सुरुवात होते.
हिंदू धर्मातील सर्व १६ संस्कारांपैकी विवाह हा सर्वात महत्त्वाचा संस्कार मानला जातो. वैदिक ज्योतिषात कोणतेही शुभ कार्य करताना शुभ मुहूर्ताचा विचार केला जातो. शुभ काळात केलेले शुभ कार्य यशस्वी आणि चांगले मानले जाते. दुसरीकडे शुभ कार्यात शुभ मुहूर्ताचा विचार केला नाही तर कामात विविध प्रकारचे अडथळे निर्माण होतात, असं म्हटलं जातं. वैदिक शास्त्रामध्ये विवाह हे पवित्र नाते मानले गेले आहे. लग्नासारखे शुभ कार्य नेहमी शुभ मुहूर्तावर करणे आवश्यक आहे. लग्नात कुंडली जुळण्यावर आणि लग्नाच्या शुभ तारखांवर विशेष लक्ष दिले जाते.
देवउठनी एकादशीनंतर शुभ कार्याला सुरुवात होते. यंदा लग्नाचा मुहूर्त १७ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे.
मंगळवार १२ नोव्हेंबर हा विवाहासाठी सर्वात शुभ दिवस असणार आहे कारण या दिवशी भगवान विष्णू योग निद्रातून जागे होणार आहेत.
बुधवार १३ नोव्हेंबर तुळशी विवाहाचा दिवस आहे. त्यामुळे हा दिवसही लग्नासाठी शुभ मानला जातो.
नोव्हेंबर – १७,२२,२३,२५,२६,२७
डिसेंबर – ३,४,५,६,७,११,१२,१४, १५,२०,२२,२३,२४,२६,२७
जानेवारी – १६,१७,१८,१९,२०,२१,२२,२३,२४,२६,२९,३०
फेब्रुवारी - १,२,३,६,७,८,१२,१३,१४,२१
मार्च - १,२,६,७,१२
एप्रिल - १४,१६,१८,१९,२०,२१,२५,२९,३०
मे - १,५,६,८,१०,१४,१५,१६,१७,१८,२२,२३,२४,२७,२८
जून- २,४,५,७,८
आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील देवशयनी एकादशीला भगवान विष्णू क्षीर सागरात जाऊन झोपतात. भगवान विष्णू आणि तुळशी यांचा विवाह देवउठनी एकादशीला होतो. देवउठनी एकादशीला देवी तुळशी आणि शालिग्राम विवाहाची परंपरा सुरू झाली आहे.
टीप : ही माहिती केवळ श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.