Dev Diwali 2024 : कार्तिक महिन्याची पौर्णिमा तिथी खूप खास मानली जाते. देवलोकात या दिवशी दीपोत्सव साजरा केला जातो. असे मानले जाते की देव देखील या दिवशी दीप प्रज्वलित करतात. या दिवशी देवी-देवता पृथ्वीवर येतात. देव दिवाळीच्या दिवशी तुळशीविवाहाचे सर्व विधी पूर्ण करून तुळशी मातेला निरोप दिला जातो. काशी म्हणजेच वाराणसीमध्ये दरवर्षी देव दिवाळी मोठ्या उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरी केली जाते. देवी-देवतांच्या स्वागतासाठी जागोजागी दिवे लावले जातात. या शुभ मुहूर्तावर भगवान विष्णू, देवी लक्ष्मी आणि भगवान शिव यांची पूजा केली जाते. तसेच घर, अंगण आणि मुख्य दरवाजावर दिवे लावले जातात. जाणून घेऊया, देव दीपावली २०२४ ची नेमकी तारीख, पूजेचा शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धत...
ज्योतिषी भारत ज्ञान भूषण यांच्यानुसार, कार्तिक महिन्याची शुक्ल पक्षाची पौर्णिमा १५ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ०६ वाजून २१ मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी १६ नोव्हेंबर रोजी पहाटे ०३ वाजता संपेल. अशा तऱ्हेने १५ नोव्हेंबरला देव दिवाळी साजरी केली जाणार आहे.
या दिवशी लाभ मुहूर्त रात्री ०८.४६ ते १०.२६ या वेळेत आहे. तर प्रदोष काल पूजेचा शुभ मुहूर्त सायंकाळी ०५.०८ ते सायंकाळी ०७.४७ वाजेपर्यंत आहे.
देव दीपावलीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे. आपल्याला शक्य असल्यास जाऊन जवळच्या पवित्र नदीत स्नान करावे. आसपास एखादी पवित्र नदी नसेल तर गंगेचे पाणी पाण्यात मिसळून घरीच आंघोळ करावी. त्यानंतर मातीच्या दिव्यात तेल आणि वात टाकून त्यांचे दीपदान करावे. यावेळी भगवान विष्णूची पूजा करावी. संध्याकाळी मंदिरात जाऊन दीपदान करावे. यावेळी विष्णू सहस्रनाम आणि विष्णू चालीसा यांचे पठण करावे. शिव आणि विष्णूच्या मंत्रांचा मनोभावे जप करावा.
१.ओम नमः शिवाय
२. ओम विष्णवे नमः
३. ओम सोमय नमः
४. ओम चान चंद्रमस्यै नमः
५. ओम नारायणाय नमः
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. त्यांचा अवलंब करण्यापूर्वी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.