Dev Diwali In Marathi: कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला देव दिवाळी साजरी केली जाते, ज्याला देवांची दिवाळी असेही म्हटले जाते. यावर्षी देव दिवाळी १३ डिसेंबर २०२३ ला आहे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवाने त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्रिपुरासुराच्या वधानंतर सर्व देवी-देवतांनी एकत्र येऊन उत्सव साजरा केला. तेव्हापासून दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला देव दिवाळी साजरी केली जाते.
देव दिवाळीच्या रात्री सर्व देवी-देवता भगवान शिवासह वाराणसी येतात आणि दिवे लावून उत्सव साजरा करतात, असे मानले जाते. यामुळेच या दिवशी वाराणसीत वेगळाच आनंद पाहायला मिळतो. देव दिवाळी अत्यंत शुभ मानली जाते. या दिवशी काही उपाय केल्याने देवांची आपल्यावर कृपा राहते.
देव दिवाळीच्या दिवशी पिठाचा किंवा मातीचा दिवा घेऊन त्यात तेल किंवा तूप टाकून दिवा लावावा. या दिव्यामध्ये ७ लवंगा ठेवा, असे केल्याने घरात समृद्धी येते आणि गरिबीही दूर होते. त्यानंतर तलावात किंवा देवाच्या ठिकाणी जाऊन दिवा दान करावा. यामुळे देवता प्रसन्न होतात आणि तुमच्या आयुष्यातील समस्याही नष्ट होतात. याशिवाय, घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांचे तोरण आणि दिवा लावा.यामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होऊन तुमच्या घरात वास करते.
देव दिवाळीच्या दिवशी भगवान विष्णूच्या चित्रावर किंवा मूर्तीवर ११ तुळशीची पाने धाग्याच्या साहाय्याने बांधा. यामुळे संपत्तीशी संबंधित समस्या दूर होतील आणि घरातील धनात वाढ होते.
यावर्षी देव दिवाळीच्या दिवशी रवियोग, परिघ योग आणि शिवयोग असे ३ योग जुळून येत आहे. देव दिवाळीच्या दिवशी सकाळी ०६.५२ वाजल्यापासून पासून रवि योगाला सुरुवात होईल. रवि योग दुपारी ०२.०५ वाजेपर्यंत असेल. तर, परिघ योग पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत १२.३७ पर्यंत असणार आहे. याशिवाय, शिवयोग सुरू होणार असून तो कार्तिक पौर्णिमेच्या रात्रीपर्यंत असणार आहे.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती धार्मिक रुढी-परंपरांवर आधारित आहे. ती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या