मराठी बातम्या  /  धर्म  /  December : डिसेंबर महिन्यातले सण आणि महत्वाचे दिवस कोणते

December : डिसेंबर महिन्यातले सण आणि महत्वाचे दिवस कोणते

Dilip Ramchandra Vaze HT Marathi
Nov 26, 2022 03:38 PM IST

December Important Days : ग्रहांच्या राशीबदलाचा सर्वच राशींवर परिणाम होणार आहे. याशिवाय डिसेंबर महिना हा सण उत्स आणि व्रत यांच्या दृष्टीनेही महत्वाचा महिना ठरणार आहे.

डिसेंबर महिन्यातले महत्वाचे दिवस
डिसेंबर महिन्यातले महत्वाचे दिवस (हिंदुस्तान टाइम्स)

डिसेंबर महिना हा इंग्रजी वर्षाचा शेवटचा महिना आहे. या महिन्यात प्रामुख्याने तीन ग्रह राशीपरिवर्तन करणार आहेत. बुध, शुक्र आणि सूर्य आपली रास बदलणार आहेत. अशात या ग्रहांच्या राशीबदलाचा सर्वच राशींवर परिणाम होणार आहे. याशिवाय डिसेंबर महिना हा सण उत्स आणि व्रत यांच्या दृष्टीनेही महत्वाचा महिना ठरणार आहे. डिसेंबर महिन्यात येणारे महत्वाचे सण उत्सव कोणते आहेत, चला पाहुया.

१. मोक्षदा एकादशी (३ डिसेंबर २०२२)

मार्गशीर्ष शुद्ध ११ रोजी मोक्षदा एकादशी आहे. सामान्य भाषेत सांगायचं झालं तर ३ डिसेंबर रोजी मोक्षदा एकादशी साजरी केली जाणार आहे. सर्व पापातून मोक्ष मिळावा या हेतूनं या दिवशी उपवास केला जातो आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही केली जाते. शास्त्रानुसार याच दिवशी गीता जयंतीही आली आहे गीता जयंती आणि मोक्षदा एकादशी एकाच दिवशी असल्याने या तिथीची तुलना मणिचिंतामणीशी केली जाते.

महापरिनिर्वाण दिन (६ डिसेंबर)

महापरिनिर्वाण दिन किंवा महापरिनिर्वाण दिवस हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन असून तो ६ डिसेंबर रोजी पाळला जातो. डॉ.आंबेडकरांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण (निधन) झाले होते, याच्या दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिमसंस्कार करण्यात आले. निधनापूर्वी त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता, त्यांना बौद्ध लोक 'बोधिसत्त्व' मानतात.

२. दत्त जयंती (७ डिसेंबर २०२२)

मी तू पणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान असं म्हणत दत्त जयंती मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला साजरी केली जाईल. म्हणजेच ७ डिसेंबर रोजी साजरी केली जाईल. महायोगीश्‍वर दत्तात्रेय हे ब्रह्मा, भगवान विष्णू आणि भगवान शिव यांचे अवतार मानले जातात आणि मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला त्यांचा जन्म झाला आणि दत्तांनी २४ गुरूंकडून त्यांनी शिक्षण घेतले. भगवान दत्तात्रेयांच्या नावाने दत्त संप्रदायाचा जन्म झाला. दक्षिण भारतात भगवान दत्त गुरुंची अनेक मंदिरे आहेत.

३. सफला एकादशी (१९ डिसेंबर २०२२)

पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला सफाळा एकादशी साजरी केली जाते आणि ती वर्षातील शेवटची एकादशी देखील आहे. या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर स्नान आणि ध्यान करून व्रत करण्याचा संकल्प केला जातो आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा विधीपूर्वक केली जाते. शास्त्रानुसार सफाला एकादशीचे व्रत केल्यास जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि मोक्ष प्राप्त होतो.

४. संत गाडगेबाबा पुण्यतिथी (२० डिसेंबर)

निष्काम कर्मयोगी म्हणून ओळखले जाणारे संत गाडगेबाबा यांची पुण्यातिथी २० डिसेंबर रोजी आहे. गाडगेबाबांनी अंधश्रद्धेला कधीच खतपाणी घातलं नाही. दीनदुबळ्यांची सेवा करण्यात गाडगेबाबा यांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं.

५. ख्रिसमस (२५ डिसेंबर २०२२)

भारतासह जगभरात २५ डिसेंबर रोजी ख्रिसमस साजरा केला जातो. ख्रिसमस हा ख्रिश्चन धर्माचा सर्वात मोठा सण आहे, या सणाची अनेक दिवसांपासून तयारी केली जाते. धार्मिक मान्यतांनुसार, प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म २५ डिसेंबर रोजी झाला होता.

६. गुरु गोविंदसिंह जयंती (२९ डिसेंबर २०२२)

गोविंद सिंग हे शिखांचे दहावे गुरु आहेत. सन १६६६ मध्ये पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या सातव्या दिवशी त्यांचा जन्म झाला. या दिवसापासून गुरु गोविंद सिंह यांचे प्रकाश पर्व साजरे केले जाऊ लागले. गुरु गोविंद सिंग हे एक अद्वितीय क्रांतिकारक संत होते. मानवी समाजाच्या उन्नतीसाठी आणि राष्ट्राच्या नैतिक मूल्यांच्या रक्षणासाठी त्यांनी अनेक त्याग आणि त्याग केले आहेत. शीख धर्माव्यतिरिक्त, गुरु गोविंद सिंग हे इतर धर्माच्या लोकांसाठी देखील प्रेरणास्थान आहेत.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग