December 2024 festival List In Marathi : प्रत्येक महिन्यात काही ना काही व्रत-वैकल्य, पूजा-पाठ, सण-उत्सव सुरुच असतात. आपल्या हिंदू धर्मात रुढी, परंपरा, चालिरिती, सण-उत्सव यांमध्ये वैविध्य आहे. निसर्गाप्रमाणेच आपल्याकडे महिने, ऋतू, सण-उत्सव साजरे करण्याची परंपरा प्राचीन काळापासून सुरू आहे.
तीन दिवसात नोव्हेंबर महिना संपून आता वर्षाचा शेवटचा डिसेंबर महिना सुरू होईल.डिसेंबर महिन्यातच मराठी मार्गशीर्षला महिन्याला देखील सुरवात होईल. त्यामुळे हा महिना व्रत-वैकल्य आणि सणांच्या बाबतीत खूप खास असणार आहे.
मार्गशीर्ष महिन्यात स्नान-दान आणि दत्त जयंतीचे विशेष महत्त्व आहे. तर या महिन्यात विशेष करून महाराष्ट्रात वैभव लक्ष्मीचे व्रत केले जाते. मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरूवारी घटस्थापना करून महालक्ष्मीचे व्रत केले जाते. आपल्या कुटूंबात धन-धान्य समृद्धी नांदावी आणि कुटूंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे यासाठी सुवासिनी हे व्रत करतात. डिसेंबर महिन्यात इतर कोणते व्रत-वैकल आहे जाणून घ्या सर्व सण-उत्सवाची यादी.
सोमवार २ डिसेंबर - देव दीपावली, मल्हारी मार्तंड षडरात्रोत्सवारंभ
बुधवार ४ डिसेंबर - विनायक चतुर्थी
शुक्रवार ६ डिसेंबर - नागपूजन-नागदिवे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुण्यतिथी
शनिवार ७ डिसेंबर - चंपाषष्ठी, स्कंदषष्ठी, मार्तंड भैरवोत्थापन
रविवार ८ डिसेंबर - भानुसप्तमी, संत रोहिदास पुण्यतिथी
सोमवार ९ डिसेंबर - मासिक दुर्गाष्टमी, अखंड नाम-जप-यज्ञ सप्ताह प्रारंभ
बुधवार ११ डिसेंबर - मोक्षदा एकादशी, गीता जयंती, विठ्ठल-रुक्मिणी लोटांगण यात्रा बालपंढरपूर
शुक्रवार १३ डिसेंबर - प्रदोष व्रत
शनिवार १४ डिसेंबर - दत्त जयंती पौर्णिमा प्रारंभ
रविवार १५ डिसेंबर - उदयो तिथीनुसार दत्त जयंती पौर्णिमा समाप्ती दुपारी २,३१
सोमवार १६ डिसेंबर - धनुर्मासारंभ
बुधवार १८ डिसेंबर - संकष्ट चतुर्थी
शुक्रवार २० डिसेंबर - संत गाडगेमहाराज पुण्यतिथी
शनिवार २१ डिसेंबर - उत्तरायणारंभ, सौर शिशिर ऋतू प्रारंभ
रविवार २२ डिसेंबर - भानुसप्तमी, कालाष्टमी
मंगळवार २४ डिसेंबर - साने गुरुजी जयंती
बुधवार २५ डिसेंबर - ख्रिसमस, नाताळ, श्री गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी
गुरुवार २६ डिसेंबर - सफला एकादशी
शनिवार २८ डिसेंबर - शनिप्रदोष
रविवार २९ डिसेंबर - शिवरात्री
सोमवार ३० डिसेंबर - दर्शवेळा अमावस्या, सोमवती अमावस्या
२ डिसेंबर रोजी शुक्र ग्रह मकर राशीत प्रवेश करेल.
७ डिसेंबर रोजी मंगळ ग्रह कर्क राशीत प्रवेश करेल.
१५ डिसेंबर रोजी सूर्य ग्रह धनु राशीत प्रवेश करेल.
२८ डिसेंबर रोजी शुक्र कुंभ राशीत असेल.