मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो. दत्तजयंतीला दत्ततत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते. या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्ततत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ मिळण्यास मदत होते.
पौर्णिमा तिथी प्रारंभ : १४ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ४ वाजून ५८ मिनिटे ते
पौर्णिमा तिथी समाप्त : १५ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी २ वाजून ३१ मिनिटे.
दत्ततत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ मिळावा यासाठी महाराष्ट्रात दत्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम होतात. दत्तांची पालखी निघते तसेच भजन-किर्तन होते. स्वामी समर्थांच्या मठात होणारे दत्त सप्ताहाचे विविध कार्यक्रम हे मोठी फलश्रुती देते असे सांगितले जाते. दत्त जयंतीनिमित्त ७ दिवसीय दत्त सप्ताह केला जातो. यात भाविक गुरुचरित्र पारायण, यज्ञ, होम-हवन आणि जपमाळ करतात. या यज्ञसप्ताहात वेगेवेगळी यज्ञ होतात. जाणून घ्या या यज्ञाचे नाव, महत्व आणि होणारा लाभ.
गणेश यागाने बुद्धी चांगली होते, विद्या प्राप्ती होते, संकट निवारण होते आणि पदोन्नतीच्या संधी मिळतात.
मनोबोध यागाने मनाचा विचलित पणा कमी होतो, योग्य दिशेस वाटचाल करण्यास सुरुवात होते आणि मानसिक विकार नाहीसे होतात.
गिताई यागाने ज्ञान प्राप्ति होते, आपल्या वागण्यातील वाईट सवयी सूटण्यास सुरुवात होते, द्वेष, मद, मत्सर, राग कमी होतो. परिणामी आपल्या अंतरंगातील सुप्त शक्ति जागृत होते.
चंडी यागाने विवाह, नोकरी, संपत्ति, कुटुंब सौख्य, प्रतिष्ठा ऐश्वर्य प्राप्त होवून घरातील तंत्र प्रयोग व् करनी नाहीशि होते परिणामी गृह शांति लाभते आणि कुलदेवीचि कृपा होते.
स्वामी यागाने श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा लाभते. ईश्वर कोपला तर गुरु राखु शकतो पण गुरु कोपला तर ईश्वरपण राखु शकत नाही या गुरुचरित्र ग्रंथातील वाचना प्रमाणे या सेवने पुढील ६ महीनेतरी स्वरक्षण प्राप्त होते, अकाल मृत्यु फक्त स्वामीच टाळू शकतात असे सांगितले जाते.
रूद्र यागाने आरोग्य प्राप्ती होते, दीर्घ आजारापासून मुक्ति मिळते, स्थिर लक्ष्मी प्राप्ती होते, अचानक येणाऱ्या संकटापासून स्वरक्षण मिळते, पितृ बाधा निवारण होते आणि शाप मुक्ति होवून कुलदैवताची कृपा होते.
संबंधित बातम्या