Datta Jayanti Shubhechha In Marathi : हिंदू धर्मात दत्त जयंतीचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दत्त जयंतीनिमित्त सात दिवसीय गुरुचरित्र पारायण केले जाते, तसेच सर्व मंदिरात अनेक भाविक हा सोहळा भजन-किर्तन करत साजरा करतात. यानिमित्त दत्तांची पालखी मिरवणूकही काढली जाते. भगवान दत्तात्रेयांची मनोभावे पूजा करणाऱ्या भक्तांना योग्य प्रकारे जीवन जगण्याचे मार्गदर्शन आणि ज्ञान मिळते असेही सांगितले जाते.
भगवान दत्तात्रेयामध्ये ब्रम्हा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचा समावेश आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो. ऋषी अत्री आणि अनुसया यांच्या पोटी श्री दत्तात्रेय भगवान यांनी जन्म घेतला होता. मार्गशीर्ष पौर्णिमेला प्रदोष काळात श्री दत्तात्रेय भगवान यांची पूजा केली जाते. यंदा कॅलेंडरनुसार १४ व उदया तिथीनुसार १५ डिसेंबर रोजी दत्त जयंती साजरी केली जाईल. हा दिवस आणखी खास करण्यासाठी आपल्या प्रियजणांना दत्त जयंतीच्या शुभेच्छा पाठवा.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!
दत्त जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा
…
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः
गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
…
ज्याच्या मनी गुरू विचार,
तो नसे कधी लाचार
ज्याच्या अंगी गुरू भक्ती,
त्याला नाही कशाचीही भीती
दत्तगुरू जयंतीच्या भक्तीमय शुभेच्छा
…
त्रिमूर्ती हा अवतार,
दत्तरूपी साकार,
त्रिभुवनी पसरे भक्तीचा सागर
होता साक्षात्कार घडतो चमत्कार,
गुरूमाऊली चरणी माझा नमस्कार
दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा
…
दत्तश्रीगुरूंचे करुया ध्यान
वंदू चरण प्रेमभावे.
ब्रह्मा विष्णू महेश एकत्र आले …
दत्त जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा
…
मन हे न्हाले भक्ती डोही ।
अनुसया उदरी धन्य अवतार ।।
केलासे उद्धार विश्वाचा या ।
माहुरगडावरी सदा कदा वास ।।
दर्शन भक्तास देई सदा ।
चैतन्य झोळी विराजे काखेत ।।
गाईच्या सेवेत मन रमे ।
चोविस गुरूचा लावियला शोध ।।
घेतलासे बोध विविधगुणी ।
दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
…
ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका,
स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका
पावलोपावली येतील कठीण प्रसंग,
फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका
दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा
…
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा
त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा
नेति नेति शब्द न ये अनुमाना
सुरवर-मुनिजन योगी समाधी न ये ध्याना
दत्त जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा