Gurucharitra Parayan Rules : श्री गुरुचरित्र इसवी सनाच्या १४व्या शतकात श्रीनृसिंह सरस्वती यांचे दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्रीगुरूंच्या शिष्यपरंपरेतील श्रीसरस्वती गंगाधर यांनी १५व्या शतकात लिहिला... श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे. संकल्प- पूर्तीसाठी श्रीगुरुचरित्र-वाचनाची पद्धती आहे. त्याप्रमाणेच वाचन, पारायण व्हावे. स्वतः गुरुचरित्रकार म्हणतात.
प्रत्येक वर्षी दत्त जयंतीनिमित्त श्री स्वामी समर्थ मठात गुरुचरित्र पारायणाचा सात दिवसांचा सप्ताह होतो. गुरुचरित्र या ग्रंथाला पवित्र वेद समजतात, म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने करावे असे सांगितले जाते. याचे नियम या ग्रंथातच दिलेले अहेत. हा ग्रंथ सात दिवसांच्या सप्ताहातच किंवा तीन दिवसातच पूर्ण करावा असा नियम आहे. जाणून घ्या गुरुचरित्र पारायण करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी.
पोथी आसन हे सात दिवस हलवले जाणार नाही असे नियोजन करून बसावे. ७ दिवस ब्रम्हचर्य पालन करावे. जमिनीवर/चटई / सतरंजी वर शयन करने, म्हणजे गादी वर झोपू नये. ७ दिवस कोणाच्याही घरचे शिजवलेले अन्न खावु नये. परंतू, सेवेकऱ्यांच्या घरचे परान्न होत नाही. शक्यतो गांव वेश सोडून जावु नए अतितटी च्या वेळी किमान जिल्ह्याच्या बाहेर तरी जावु नये. काळे वस्त्र पारायण सुरु झाल्यावर किमान ७ दिवस वापरू नये, तसेच चामड्याचे वस्तू शक्यतो वापरू नये.
कोणाविषयी द्वेष ठेवु नका. बोलतांना शब्दांचे भान ठेवा, अपशब्द वापरू नका. गुरुचरित्र हा ५ वा वेद आहे. यामुळेच पारायण काळात अभद्र बोलले गेले, वागले गेले, शब्ध उच्चार चुकीचे झालेत यास्तव क्षमा याचना म्हणून रोज रात्री किंवा झोपण्यापूर्वी विष्णु सहस्त्रनाम वाचन एक वेळ घरी करावे.
गर्भवती स्री पारायणास बसु शकते पण शास्त्र वचन म्हणते की, ७ व्या महिन्याच्या पुढे गरोदर स्त्रीस जास्त काळ बैठक शक्य होत नाही त्यामुळे इतर सेवेत भाग घ्यावा ज्यांना शक्य असेल त्यांनी बसण्यास हरकत नाही.
कांदा, लसुन खावु नये. विज्ञान सांगते की शरीराची उष्णता वाढल्यास आपणास त्रास होवू शकतो. एसिडिटी वाढणार यास्तव डाळ, द्विदल धान्य वर्ज्य करावी. त्याबदल्यात दूध पोळी, हिरवी भाजी पाले भाजी फळ भाजी घ्यावी फळे ही चालतात. सात दिवसात उपवास दिवस आल्यास साबुदाणा भगर शेंगदाणे चालतील. दोन्ही वेळ जेवण करावे. सात दिवस उपवास करण्याची आवश्यकता नाही. थोडक्यात आहार शास्त्र महत्वाचे आहेत.
एक धान्य गहू खावे आणि गव्हाची चपाती खावी.
पालेभाजी खाऊ शकतात. लाल माठ, हिरवा माठ, राजगीरा, पालक,करडई, कोथिंबीर, कडीपत्ता इ.
फळभाज्या खाऊ शकतात (बटाटा , टॉमॅटो, फुलकोबी, पत्ताकोबी, घोशाळ (गिलके ), ढोबळी मिरची, हिरवी व लाल मिरची, तोंडले, गाजर ,सुरण, रताळे)
सर्व फळे खाऊ शकतात. (कडू वर्ज्य)
तेल सुर्यफुल व करडई तेल वापरू शकतात. शेंगदाणा तेल, सोयाबीन तेल शक्यतो वापरू नये.
मसाला मध्ये हळद, लाल मिरची, जिरे खाऊ शकतात. (गरमसाला, कोरडा गरम मसाला वर्ज्य)
दुध, दही, ताक, कढी खाऊ शकतात.
पारायण काळादरम्यान वारानुसार उपवास असेल तर उपवासाचे पदार्थ खाऊ शकतात (शिंगाडा पीठ, बटाटे, रताळे, साबुदाणा,राजगिरा खाऊ शकतात.)
द्वीदल धान्य, कडधान्य, शेंगदाणे, डाळी, खाऊ नये. गवार, वांगे, कारले, वाल, शेपू, मेथी, कांदापात, लसूण, कांदा, मोहरी, वरण भात वर्ज्य. पित्तकारक पदार्थ, वातकारक भाज्या, बाहेरचे पदार्थ, मैदा खाऊ नये.
पारायण समाप्तीला पोथीसाठी एक, देवांसाठी एक, गाईसाठी एक असा नैवेद्य दाखवावा त्यात वरण भात, श्रावण घेवडा भाजी, कांदा भजी, गोड पदार्थ, चपाती/पुरी, मीठ लिंबू चटणी कोशिंबीर, करावे. नैवेद्य दाखवून झाल्यावर गणपति, देवी, श्री स्वामी समर्थ महाराज, दत्त महाराज यांच्या आरती करावी. समाप्ती दुपारी बारा वाजण्याच्या अगोदर करावी.
संबंधित बातम्या