Amavasya : अमावस्या आणि शनिवारचा शुभ संयोग, शनिच्या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी करा या गोष्टी
मराठी बातम्या  /  धर्म  /  Amavasya : अमावस्या आणि शनिवारचा शुभ संयोग, शनिच्या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी करा या गोष्टी

Amavasya : अमावस्या आणि शनिवारचा शुभ संयोग, शनिच्या त्रासातून मुक्ती मिळवण्यासाठी करा या गोष्टी

Published Nov 29, 2024 01:26 PM IST

Darsha Amavasya 2024 Shubh Yog In Marathi : शनिदेवाच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी अमावस्येचा दिवस खास आहे. यंदा नोव्हेंबरमध्ये अमावस्या आणि शनिवार असा विशेष योगायोगही घडत आहे. या खास संयोगात काय करावे जाणून घ्या.

दर्श अमावस्या आणि शनिवार संयोग
दर्श अमावस्या आणि शनिवार संयोग

Darsha Amavasya 2024 : दर्श अमावस्या हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी पितरांचे स्नान-दान दाखवला जातो आणि देवी-देवतांची पूजा केली जाते. असे मानले जाते की, दर्शन अमावस्येच्या रात्री काही विशेष उपाय केल्याने सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते आणि जीवनात सुख-समृद्धी येते.

शनि, राहू-केतू आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अमावस्येचा दिवस सर्वोत्तम मानला जातो. अमावस्या हा शनिदेवाचा जन्मदिवसही मानला जातो. यावर्षी नोव्हेंबरमध्ये अमावस्येच्या दिवशी शनिवारचा विशेष योगायोग आहे.

ज्या लोकांच्या कुंडलीत शनीची साडेसाती किंवा ढैय्या आहे त्यांनी अमावस्येच्या दिवशी शनीसाठी काही खास उपाय करायला विसरू नये, असे मानले जाते की यामुळे शनिदेवाच्या त्रासांपासून आराम मिळतो.

दर्श अमावस्या तिथी प्रारंभ आणि समाप्ती

दर्शन अमावस्या तिथी ३० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजून २९ मिनिटांनी सुरू होईल. आणि १ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी समाप्त होईल. अशा स्थितीत, उदया तिथीनुसार, दर्श अमावस्या शनिवार, ३० नोव्हेंबर रोजीच साजरी केली जाईल, कारण अमावस्याची पूजा रात्री केली जाते.

अमावस्येला शनिदेवासाठी करा हे उपाय

दर्श अमावस्या आणि शनिवारी शनिदेवाला मोहरीच्या तेलाने अभिषेक करावा आणि तेलात काळे तीळ टाकावेत. काळे-निळे कपडे आणि निळी फुले अर्पण करा. त्यानंतर ॐ शनैश्चराय नमः या मंत्राचा जप करावा. सूर्यास्तानंतर हे उपाय करा. असे मानले जाते की यामुळे शनीचा अशुभ प्रभाव कमी होतो.

दर्श अमावस्येला संध्याकाळी तुपाचा दिवा लावून नदीत किंवा तलावात वाहून द्यावा. यामुळे पितरांना शांती मिळते आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो.

अमावस्येच्या दिवशी हनुमान चालिसाचे पठण करणे खूप फायदेशीर आहे. शनि त्याच्या तेजाने प्रसन्न होतो आणि बजरंगबलीच्या भक्तांवर कृपा करतो.

अमावस्येला पिंपळाच्या झाडाची पूजा करावी. या दिवशी सकाळी पिंपळाच्या झाडाच्या मुळाला दूध आणि पाणी अर्पण करावे. त्यानंतर पिंपळाच्या पाच पानांवर पाच मिठाई ठेवा आणि त्यानंतर तुपाचा दिवा लावून त्याभोवती सात वेळा प्रदक्षिणा घाला. संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली शनि स्तोत्राचे पठण करा. असे म्हणतात की, यामुळे जीवनातील आर्थिक संकट दूर होते. नोकरीत येणाऱ्या अडचणी संपतील.

शनिवार व अमावस्या निमित्त गरजूंना मोहरीचे तेल, काळे तीळ, कपडे, चादरी, चप्पल यांचे दान करावे कारण हिवाळ्यात हे दान केल्याने शुफ फळ मिळते.

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner