श्रीकृष्ण जयंतीनंतर दहीहंडी हा सण साजरा करतात. २७ ऑगस्ट रोजी दहीहंडी म्हणजेच गोपाळकाला साजरा केला जाईल. श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो आणि त्याच्या दुसर्या दिवशी गोपाळकाल्याचा उत्सव साजरा करून दहीहंडी फोडून जल्लोष करण्याची पद्धत आहे.
श्रीकृष्णाला बालपणी दही, दूध, लोणी या पदार्थांची आवड होती. कृष्णापासून दह्याचे रक्षण व्हावे यासाठी यशोदा दह्याची हंडी उंच ठिकाणी किंवा शिक्यावर ठेवत असे पण श्रीकृष्ण तिथपर्यंत पोहचण्यात यशस्वी होत असे. यासाठी त्याचे, मित्र त्याला मदत करत असत. तसेच, श्रीकृष्ण गायी चारताना स्वत:ची व सवंगड्यांनी घरून आणलेल्या शिदोर्या एकत्र करून त्या खाद्यपदार्थांचा काला करुन सर्वांसह खात असे. या कथेला अनुसरून पुढे गोकुळाष्टमीच्या दुसर्या दिवशी काला करण्याची व दहीहंडी फोडण्याची प्रथा पडली. या घटनेची आठवण म्हणून सर्वत्र दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो.
श्रीकृष्णाला बालपणी दही, दूध, लोणी या पदार्थांची आवड होती. कृष्णापासून दह्याचे रक्षण व्हावे यासाठी यशोदा दह्याची हंडी उंच ठिकाणी किंवा शिक्यावर ठेवत असे पण श्रीकृष्ण तिथपर्यंत पोहचण्यात यशस्वी होत असे. यासाठी त्याचे, मित्र त्याला मदत करत असत. या घटनेची आठवण म्हणून सर्वत्र दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो.
तुझ्या घरात नाही पाणी
घागर उताणी रे गोपाळा
गोविंदा रे गोपाळा,
यशोदेच्या तान्ह्या बाळा
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा
…
हंडीवर आमचा डोळा,
दह्या दुधाचा काला,
मटकी फोडायला आला
गोवींदा रे गोपाळा
दहीहंडीच्या मन:पूर्वक शुभेच्छा
…
दह्यात साखर, साखरेत भात
दहीहंडी उभी करुन देऊया एकमेकांना साथ,
फोडूया हंडी लावून उंच थर,
जोशात साजरा करुया दहीहंडीचा हा सण,
दहीहंडीच्या शुभेच्छा!
…
लोण्यासाठी भांडणारा आणि गोपिकांना छेडणारा
सगळ्यांचा रक्षणकर्ता आणि सर्वांचा प्रिय असा कन्हैया
दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा
…
दनाचा सुवास,फुलांची बरसात,
दह्याची हंडी आणि पावसाची बरसात,
लोणी चोरायला आला माखनलाल,
गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!
…
हातात घेऊनी बासरी आला कृष्ण
थरावर थर रचून झाले मित्र सज्ज
मटकी फोडू, खाऊ लोणी
गोविंदा रे गोपाळा गाऊ गाणी
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा
…
फुलांचा हार
पावसाची सर
राधा-कृष्णाच्या प्रेमाला आली बहर
साजरा करुया गोपालकाल्याचा सण!
दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा!