Merry Christmas Wishes : नाताळच्या खास शुभेच्छा देऊन प्रियजनांचा आनंद द्विगुणीत करा
मराठी बातम्या  /  धर्म  /  Merry Christmas Wishes : नाताळच्या खास शुभेच्छा देऊन प्रियजनांचा आनंद द्विगुणीत करा

Merry Christmas Wishes : नाताळच्या खास शुभेच्छा देऊन प्रियजनांचा आनंद द्विगुणीत करा

Dec 25, 2024 09:51 AM IST

Merry Christmas 2024 Wishes In Marathi : दरवर्षी २५ डिसेंबर रोजी नाताळ सण साजरा केला जातो. या दिवशी लोक एकमेकांना सोशल मीडियावर तसेच प्रत्येक्षात भेटून नाताळ सणाच्या शुभेच्छा देतात. तुम्हीही आपल्या प्रियजणांना या खास सणाच्या शुभेच्छा देऊन त्यांचा आनंद द्विगुणीत करू शकतात.

नाताळच्या हार्दिक शुभेच्छा
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा

Natal 2024 Wishes In Marathi : ख्रिसमस, म्हणजेच नाताळ, हा जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विशेषतः ख्रिश्चन धर्मीयांसाठी हा सर्वात महत्वाचा सण आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून २५ डिसेंबरला हा सण साजरा केला जातो. ख्रिश्चन धर्मानुसार, येशू ख्रिस्त हे देवाचे पुत्र होते आणि ते मानवजातीला वाचवण्यासाठी पृथ्वीवर आले होते. त्यांचा जन्म बेथलहेम येथे झाला होता. इसवी सन ३४५ मध्ये, पोप ज्युलियस पहिला यांनी २५ डिसेंबर हा दिवस येशूंचा जन्मदिवस म्हणून निश्चित केला. ख्रिसमस ला नाताळ असेही म्हणतात, 'नाताळ' हा शब्द 'जन्म' या अर्थाच्या 'नातूय' या लॅटिन शब्दावरून आला आहे.

ख्रिसमस ट्री हे या सणाचे एक महत्वाचे प्रतीक आहे. ख्रिसमसच्या काळात घरोघरी ख्रिसमस ट्री उभारले जातात आणि त्याला आकर्षकपणे सजवले जाते. सांता क्लॉज रात्री घरोघरी जाऊन लहान मुलांसाठी भेटवस्तू ठेवतात, अशी मान्यता आहे. ते लाल रंगाचा पोशाख, पांढरी दाढी आणि काळे बूट घालतात. त्यांच्या हातात एक मोठी थैली असते, ज्यात मुलांसाठी खेळणी आणि इतर भेटवस्तू असतात.

ख्रिसमसच्या दिवशी चर्चमध्ये विशेष मिस्सा आयोजित केली जाते, ख्रिसमस हा जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, पण प्रत्येक देशाची स्वतःची अशी वेगळी पद्धत आणि परंपरा आहे. नाताळच्या दिवशी ख्रिसमसची गाणी गायली जातात. मित्र आणि कुटुंबीय एकमेकांना भेटवस्तू देतात. तसेच, या दिवसाचा आनंद आणखी वाढवण्यासाठी प्रियजणांना शुभेच्छा देत असाल तर या शुभेच्छा संदेशाचा उपयोग होईल वाचा, पाठवा आणि स्टेटस ठेवा.

नाताळच्या शुभेच्छा

मेरी ख्रिसमस!

सर्व ख्रिस्ती बांधवाना

नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा…

तुमच्यासाठी सांता

आनंद, समृद्धी आणि यश घेऊन येवो.

तुमच्या मनातल्या,

सर्व इच्छा तो पूर्ण करो...

नाताळाच्या मन:पूर्वक शुभेच्छा.

होऊदे तुमच्यावर सुखाची उधळण!

तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना

नाताळ सणाच्या खूप खूप शुभेच्छा!

ख्रिसमसच्या दिवशी

आपल्या सर्व इच्छा-आकांशा पूर्ण होवो

नाताळच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा...

आला नाताळ घेऊनी आनंद चहूकडे,

केलेल्या चुकांची माफी मागुया प्रभूकडे,

मनात धरूया आशा,

सर्व सुखी राहू दे,

प्रभूची कृपा-दृष्टी आपल्यावर नेहमी राहू दे…

ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा!

यंदाचा ख्रिसमस व येणारे नवीन वर्ष,

तुमच्या आयुष्यात सुख-शांती,

समृद्धी, आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना..

नाताळच्या खूप खूप शुभेच्छा!

मेरी ख्रिसमस.

Whats_app_banner