Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2024: छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याचा पाया रचला. स्वराज्य स्थापन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूंशी लढा देऊन, त्यांना परतवून लावले. सोमवारी (१९ फेब्रुवारी) छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४वी जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० ला पुण्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.
शूर, हुशार, दयाळू आणि रयतेचे राजे म्हणून म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाजी राजांनी स्वराज्य स्थापनेसाठी अनेक गोष्टी केल्या. अशा परिस्थितीत तुम्ही शिवजंयती निमित्त खालील शुभेच्छा व्हॉट्सअॅप, फेसबूक आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून देऊ शकता.
इतिहासाच्या पानावर
रयतेच्या मनावर
मातीच्या कणावर आणी
विश्वासाच्या प्रमाणावर
राज्य करणारा राजा म्हणजे
राजा शिवछत्रपतींना मानाचा मुजरा
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
…
पूर्ण स्वराज्य हे एकच होते ज्याचे लक्ष्य
स्वराज्याचे स्वप्न केले ज्यांनी साकार
शिवजयंती दिनी करु त्या शिवछत्रपतींचा जयजयकार
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
…
प्रौढ प्रताप पुरंदर,
क्षत्रिय कुलावतंस,
सिंहासनाधी श्वर,
महाराजाधिराज महाराज श्रीमंत
श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय!
शिवजयंती च्या सर्वांना शुभेच्छा!
…
मातृभूमीच्या रक्षणासाठी आपले
जीवन अर्पण करणारे
अदम्य साहस आणि स्वाभिमानाचे प्रतिक
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा.
…
मराठी माझी जात
मराठी माझा धर्म
मराठी माझी माती
मराठी माझं रक्त
मराठी माझी शान
मराठी माझा मान
मराठी माझा राजा
जय शिवराय
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
…
जगातील एकमेव राजा असा आहे
ज्याचा जन्म आणि मृत्यू किल्ल्यावरच झाला
तो राजा म्हणजेच छत्रपती श्री शिवाजी महाराज.
शिव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
…
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा
…
जगातील एकमेव राजा असा आहे,
ज्याने स्वतःसाठी एकही, राजवाडा महल नाही बांधला,
तो राजा म्हणजे, छत्रपती श्री शिवाजी महाराज,
इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर,
मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर,
राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती
शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा
संबंधित बातम्या