राजर्षी शाहू महाराजांचा जन्म २६ जुन १८७४ रोजी कागलच्या घाटगे घराण्यात झाला. कागलचे जहागीरदार जयसिंगराव आबासाहेब घाटगे हे त्यांचे जन्मदाते वडील राधाबाई ही त्यांची जन्मदाती माता. शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव होते. छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू अशा विविध नावांनी ते प्रसिद्ध होते. ते दहा वर्षांचे असताना कोल्हापूरचे राजे चौथे शिवाजी यांची राणी आनंदीबाई यांनी १८ मार्च १८८४ रोजी त्यांना दत्तक घेतले व ते कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती शाहू महाराज झाले.
छत्रपती साहू महाराज ही अशी व्यक्ती होती की ज्यांनी राजा असूनही दीन-दलित आणि शोषित वर्गाचे दुःख समजून त्यांच्याशी सदैव जवळीक ठेवली. दलित वर्गातील मुलांना मोफत शिक्षण देण्याची प्रक्रिया त्यांनी सुरू केली. गरीब विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे स्थापन करून बाहेरील विद्यार्थ्यांना निवारा देण्याचे आदेश महारांजानी दिले.
एक अत्यंत महत्वाचा निर्णय शाहू महाराजांनी त्यांच्या कारकीर्दीत घेतला तो म्हणजे बालविवाह प्रथा बंद करण्याचा. १९१८ साली राज्याची जुनी परंपरा वतनदारी शाही महाराजांनी संपुष्टात आणली. छत्रपती शाहू महाराज यांचे १० मे १९२२ रोजी मुंबईत निधन झाले. त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी या शुभेच्छा संदेश शेअर करा.
समता, बंधुता यांची शिकवण देणारा
आरक्षणाधीश, लोकराजा
छत्रपती शाहू महाराज यांना
जयंती निमित्त त्रिवार अभिवादन!
…
संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेरणास्त्रोत
दीन-शोषितांचे तारणहार,
थोर समाजसुधारक
राजर्षी शाहू महाराज यांना
जयंतीनिमित्त मानाचा मुजरा!
…
बहुजन समाजाला
स्वाभिमानाचे नवं जीवन देणार्या
लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना
जयंतीनिमित्त अभिवादन
…
अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान,
श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना,
त्रिवार मानाचा मुजरा…
सर्वांना शाहू महाराज जयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा…!!
…
संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेरणास्त्रोत
दीन-शोषितांचे तारणहार,
थोर समाजसुधारक
राजर्षी शाहू महाराज यांना
जयंतीनिमित्त मानाचा मुजरा!
…
भटक्या, विमुक्त जमातींचे आधारस्तंभ
छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या
जयंती निमित्त अभिवादन!
…
आपली राजसत्ता खऱ्या अर्थाने
वंचित समाजासाठी वापरणारे
आरक्षणाधीश, लोकराजा राजर्षी शाहू महाराज
यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
…
दीन-दलित आणि शोषित वर्गाचे दुःख समजून
राज्याची जुनी परंपरा संपूष्टात आणणाऱ्या
छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या
जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन आणि मनपूर्वक शुभेच्छा!
…
समता, बंधुता यांची शिकवण देणारे
दीन-शोषितांचे तारणहार,
थोर समाजसुधारक
छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त
विनम्र अभिवादन
संबंधित बातम्या