Sambhaji Maharaj Rajyabhishek Din : 'स्वराज्याचा छावा' छत्रपती संभाजी महाराजांविषयी तुम्हाला या गोष्टी माहीत आहे का?
मराठी बातम्या  /  धर्म  /  Sambhaji Maharaj Rajyabhishek Din : 'स्वराज्याचा छावा' छत्रपती संभाजी महाराजांविषयी तुम्हाला या गोष्टी माहीत आहे का?

Sambhaji Maharaj Rajyabhishek Din : 'स्वराज्याचा छावा' छत्रपती संभाजी महाराजांविषयी तुम्हाला या गोष्टी माहीत आहे का?

Jan 16, 2025 10:43 AM IST

Chhatrapati Sambhaji Maharaj Rajyabhishek Din : १६ जानेवारी हा दिवस छत्रपती संभाजी महारांजाचा राज्याभिषेक दिन म्हणून साजरा करतात. जाणून घ्या स्वराज्याचा छावा छत्रपती संभाजी महाराजांविषयी तुम्हाला या गोष्टी माहीत आहे का?

छत्रपती संभाजी महाराज
छत्रपती संभाजी महाराज

स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा आज राज्याभिषेक दिन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याची धुरा सक्षमपणे आपल्या हातात घेऊन पराक्रम करणारे संभाजी महाराज होते. अनेक मोहिमा संभाजी राजेंनी यशस्वीपणे राबवल्या. 

अचाट धैर्य, अजोड पराक्रम, असमान्य शौर्य, प्रयत्नांची पराकाष्ठा, अनेक भाषांवर प्रभुत्व, संस्कृत पंडित, धर्माभिमानी, व्यासंगी, आदर्श महावीर, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, धर्मकारण अशा अनेक क्षेत्रात आपले निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काही गोष्टी आपल्याला माहिती असायलाच हव्यात. जाणून घेऊया...

छत्रपती संभाजी महाराजांसंबंधी प्रश्न-उत्तरे -

प्रश्न - छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोठे झाला ?

उत्तर - छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर येथे झाला.

प्रश्न - छत्रपती संभाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते ?

उत्तर - छत्रपती संभाजी महाराजांच्या आईचे नाव सईबाई होते.

प्रश्न - छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीचे नाव काय होते ?

उत्तर - छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीचे नाव येसूबाई होते.

प्रश्न - छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलांचे नाव काय ?

उत्तर - छत्रपती संभाजी राजांना दोन अपत्ये होती. एक मुलगा आणि एक मुलगी. मुलाचे नाव शाहू महाराज होते आणि मुलीचे नाव भवानीबाई होते.

प्रश्न - छत्रपती संभाजी महाराज जेव्हा शिवाजी महाराजांसोबत आग्रा येथे औरंगजेब बादशाहाला भेटायला गेले होते तेव्हा त्यांचे वय किती होते ?

उत्तर - छत्रपती शिवाजी महाराजांसोबत आग्रा येथे औरंगजेब बादशाहाला भेटायला गेले तेव्हा संभाजी महाराजांचे वय नऊ वर्षे होते.

प्रश्न - छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या १४ व्या वर्षी कोणता ग्रंथ लिहिला ?

उत्तर - छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ लिहिला होता. हा ग्रंथ दोन खंडांमध्ये लिहिला गेला होता.

प्रश्न - छत्रपती संभाजी महाराजांनी किती युद्ध लढली ?

उत्तर - छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या कार्यकाळात १२० ते १५० युद्धे लढली होती. या सर्व युद्धांमध्ये त्यांना एकही पराभव झाला नव्हता.

प्रश्न - छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वर येथे कोणी पकडले ?

उत्तर - छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वर येथे मुकरब खानने पकडले होते असे सांगण्यात येते.

प्रश्न - छत्रपती संभाजी महाराजांची समाधी कोठे आहे ?

उत्तर - छत्रपती संभाजी महाराजांची समाधी तुळापुर येथे आहे.

 

Whats_app_banner