मराठी बातम्या  /  धर्म  /  Chhatrapati Sambhaji Maharaj : रायगडावर हर्ष दाटला! शेतकऱ्याच्या हस्ते पार पडणार शंभूराजेंचा राज्याभिषेक सोहळा

Chhatrapati Sambhaji Maharaj : रायगडावर हर्ष दाटला! शेतकऱ्याच्या हस्ते पार पडणार शंभूराजेंचा राज्याभिषेक सोहळा

Jan 16, 2024 10:58 AM IST

chhatrapati sambhaji maharaj rajyabhishek din 2024: आज १६ जानेवारी २०२४ रोजी रायगडावर छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा दिन कसा साजरा केला जाईल ते जाणून घ्या.

Sambhaji Maharaj
Sambhaji Maharaj

आज १६ जानेवारी २०२४ रोजी छत्रपती संभाजी राजांचा ३४३ वा राज्याभिषेक सोहळा आहे. दरवर्षी हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. यंदा राजधानी किल्ले रायगडवर हा उत्साह साजरा होणार असून, तो शेतकऱ्यांच्या हस्ते पार पडणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

संभाजी राजे यांनी सलग नऊ वर्षे औरंगजेबाला सळो की पळो करून सोडले होते. १६ जानेवारी १६८१ रोजी संभाजी महाराजांनी आपला राज्याभिषेक करून घेतला त्यामुळे १६ जानेवारी हा दिवस संभाजी राजे राज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जातो. संभाजी राजांनी त्यांच्या अल्पशा कारकिर्दीत २०१ युद्धे लढली आणि त्यातील एक मुख्य गोष्ट म्हणजे त्यांच्या सैन्याचा एकाही लढाईत पराभव झाला नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांनंतर मराठ्यांच्या हिंदवी स्वराज्याची कमान सांभाळणार्‍या छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यकथा अंगावर काटा आणणाऱ्या आहेत.

संभाजी राजे यांना २० जुलै १६८० रोजी पन्हाळा येथे राजा म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती आणि नंतर त्यांचा अधिकृत राज्याभिषेक सोहळा १६ जानेवारी १६८१ रोजी झाला होता. छत्रपती संभाजी राजे यांचा राज्याभिषेक सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाप्रमाणेच भव्य आणि उत्साहात संपन्न झाला होता.

त्याकाळात देखील राज्याच्या प्रमुख उत्पन्नाचे साधन शेती हेच होते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे दुसरे दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती संभाजीराजांचे कार्यकर्तृत्व केवळ महाराष्ट्राच्या चौकटीत मावणारे नव्हते. अन्यायग्रस्तांना न्याय देणे, दुष्काळग्रस्तांना मदत करणे, प्रकल्पग्रस्तांचे तत्काळ पुनर्वसन करणे, ही कामे संभाजीराजे तत्काळ पूर्ण करत असत.

शेतकऱ्यांच्या हस्ते राज्याभिषेक सोहळा

छत्रपती संभाजी राजे यांचा राज्याभिषेक सोहळा गेली नऊ वर्षे रायगडावर विविध संकल्पनांच्या माध्यमातून साजरा केला जात आहे. आपला देश कृषीप्रधान म्हणून ओळखला जातो आणि यंदा पोशींदा राजा या संकल्पनेवर सोहळ्याचं आयोजन केलं असून, शेतकर्‍याच्या हस्ते या वर्षीचा राज्याभिषेक सोहळा दिमाखात साजरा केला जाणार असल्याचे सोहळा समितीने सांगितलं.

WhatsApp channel