बुधवार १९ जून रोजी छत्रपती संभाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती साजरी होणार आहे. काही लोक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती तारखेनुसारही साजरी करतात. त्यामुळे महाराजांची जयंती एकाच वर्षी दोन वेळा साजरी होते. या दिवशी छत्रपतींच्या शौर्याचे पोवाडे गायले जातात. गड-किल्ल्यांवर उत्सवांचे आयोजन होते. विविध कर्यक्रमांच्या जल्लोषात शंभु राजाच्या स्मृतीस वंदन केले जाते.
शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र संभाजी भोसले हे त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर मराठा राज्याचे दुसरे शासक बनले. छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांच्या पोटी संभाजीराजे भोसले यांचा जन्म १४ मे १६५७ रोजी झाला. मराठा साम्राज्याचे दुसरे शासक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र संभाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते, त्यांची जयंती महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
तस्यात्मज:शंभुरिति प्रसिद्ध:समस्तसामन्त शिरोवतंस:| यःकाव्यसाहित्य पुराणगीतकोदण्डविद्यार्णव पारगामी ||
अर्थ: अशा त्या थोर शिवप्रभूंच्या समस्त मांडलिकामध्ये शिरोभूषण म्हणून शोभणारा आत्मज (आत्मन्चा अंश) शंभू (राजा) म्हणून प्रसिद्धीस आला. शंभुराजे काव्य, साहित्य, संगीत,धनुर्विद्या इ. कलेत पारंगतच झालेले होते.
कोंढाण्यासाठी तानाजी गेला
घोडखिंडीसाठी समोर बाजी आला
महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी,
स्वराज्य रक्षक संभाजी झाला,
छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
…
पाहुनी शौर्य तुझपुढे,
मृत्यूही नतमस्तक झाला,
स्वराज्याच्या मातीसाठी
शिवाजी महाराजांचा पुत्र
शंभु समोर आला
छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा
…
साखळदंड ज्याच्या रक्तात भिजला,
जिथे मृत्युही थिजला,
जो या मातीसाठी
आयुष्यभर झिजला
अशा मृत्युंजय वीरास मानाचा मुजरा
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्य हार्दिक शुभेच्छा
…
रयतेचे रक्षण ही एकच होती मनी आस
स्वराज्याचा ज्याला लागतो हो ध्यास
दुष्मनांना वाटत होती ज्यांची भीती
असे संभाजी राजे ‘छत्रपती’
छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
…
श्रृंगार होता संस्काराचा,
अंगार होता हिंदवी स्वराज्याचा,
शत्रूही नतमस्तक होई जिथे,
असा पुत्र होता छत्रपती शिवरायांचा,
छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतीस त्रिवार वंदन
…
शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक,
धर्मनिष्ठा आणि देशभक्तीचे प्रेरणास्थान असलेल्या
छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या जयंती निमित्त शतशः प्रणाम.
…
म्हणती सारे माझा माझा,
मराठा राजा महाराष्ट्राचा,
ओवाळूनी पंचारती
आजही गौरव गिते गाती,
ते फक्त “छत्रपती संभाजी महाराज"
छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा